अमळनेर

समाजसेवेचे व्रत घेतलेले कृतिशील आमदार म्हणून डॉ.तांबेसाहेबांना पुन्हा सेवेची संधी द्या.” : मनोज पाटील

अमळनेर (नूर खान) नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सुधीर तांबे यांच्या विकासनिधीतून अमळनेर तालुक्यातील 12 शाळांना संगणक संच, प्रिंटरचे वाटप कार्यक्रमप्रसंगी अमळनेर कॉंग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष तथा अमळनेर नगर परीषद चे माजी बांधकाम सभापती मनोजबापू पाटील यांनी वरील उदगार काढले.

तांबे यांच्या विकास निधीतून अमळनेर तालुक्यातील 12 शाळांना संगणक-प्रिंटर चे वाटप

दि.10 मार्च 2022 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतीदिनी अमळनेर येथील रॉयल उर्दू हायस्कूलच्या प्रांगणात डॉ.सुधीर तांबे (आमदार, नाशिक पदवीधर मतदार संघ) यांचा स्थानिक विकास कार्यक्रम निधी 2021-22 अंतर्गत अमळनेर तालुक्यातील 10 शाळांना एचपी चे प्रत्येकी 1 संगणक संच व 2 शाळांना कॅनन चे प्रिंटर वाटप मनोज पाटील (शहराध्यक्ष, कॉंग्रेस कमेटी अमळनेर), शांताराम पाटील (ज्येष्ठ कॉंग्रेस नेते), गोकुळ बोरसे (अध्यक्ष, अमळनेर ग्रामीण कॉंग्रेस), सुलोचना वाघ (जिल्हाध्यक्ष, महिला कॉंग्रेस कमेटी जळगांव), भागवत सूर्यवंशी (प्रशासक मार्केट कमिटी), महेश पाटील (तालुकाध्यक्ष, युवक कॉंग्रेस कमेटी अमळनेर) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी राजू शेख ,शहर उपाध्यक्ष काँग्रेस, अहमद पठाण,जुबेर पठाण शहराध्यक्ष,अल्पसंख्यांक काँग्रेस, मनोज बोरसे, कुणाल चौधरी, रियाज मौलाना, तौसिफ तेली, अजहर सय्यद, सईद तेली, राजु भाट, अनिस कुरेशी, रजाक शेख, इमरान अरब, नाविद शेख, एस.एन.पाटील, राजु भाट, मनोज बोरसे, जयेश पाटील आदी कार्यकर्ते व विविध शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवत सूर्यवंशी यांनी केले व आभार महेश पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे संपुर्ण व्यवस्थापन रॉयल उर्दू हायस्कूल च्या संचालकांनी करुन अनमोल सहकार्य केले.

संगणक संच मिळालेल्या शाळा
1) जि.प.उच्च प्राथ.शाळा, पिंगळवाडे
2) सर्वोदय माध्य.विद्यालय, कावपिंप्री
3) नवभारत माध्य विद्यालय, दहिवद
4) नवीन माध्य.विद्यालय, अंतुर्ली-रजाणे
5) यशवंत माध्य.आदिवासी आ.शाळा पिपळे बु.
6) सु.आ.पा.आदिवासी आश्रमशाळा पिंपळे बु.
7) कै.खुशालदादा माध्य.आश्रमशाळा, गडखांब
8) नानासाहेब उ.पा.आश्रमशाळा, निभोरा
9) अलफैज उर्दु गर्ल्स हायस्कुल, अमळनेर
10) रॉयल उर्दू हायस्कुल अमळनेर

प्रिंटर मिळालेल्या शाळा
1) विजयनाना पाटील आर्मीस्कूल, अमळनेर
2) सा.फुले कन्या विद्यालय, अमळनेर

साहित्य घेणेसाठी उपस्थित संबधित शाळेचे मुख्याध्यापक तथा प्रतिनिधी खालीलप्रमाणे

दत्तात्रय सोनवणे (जि.प.उच्च प्राथ.शाळा पिंगळवाडे), संजय महाजन (सर्वोदय माध्य.विद्यालय, कावपिंप्री), सुशील भदाणे (माध्य विद्यालय,दहिवद), आर.बी.पाटील (नविन माध्य.विद्यालय अतुर्ली-रंजाणे), उदय पाटील (यशवंत माध्य.आश्रमशाळा, पिंपळे बु), अविनाश अहिरे (सु.आ.पाटील आदीवासी आश्रम शाळा पिंपळे बु), प्रमोद पाटील (कै.खुशाल दादा माध्य.उच्च माध्य.आश्रमशाळा गडखांब), प्रदिप सोनवणे (नानासाहेब उ.पा.आश्रमशाळा,निभोंरा), शरिफ शेख इब्राहिम (अल्फैज उर्दू स्कूल,अमळनेर), अखलाख अहमद शेख (रॉयल उर्दू शाळा,अमळनेर), सुर्यकांत बाविस्कर (विजयनाना पाटील आर्मी स्कूल,अमळनेर), दिलीप ठाकरे (सा.फुले विद्यालय,अमळनेर)

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे