महाराष्ट्र
वीरांगना झलकारीबाई कोळी संस्थेच्या वतीने धुळ्यात महिलादिन उत्साहात साजरा
धुळे (गोपाळ कोळी) वीरांगना झलकारीबाई कोळी स्री शक्ती सामाजिक संस्था धुळे यांच्या वतीने वाडीभोकर रोड वरील रेणूका नगर येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुण्या अँड. मिनल क्षिरसागर यांच्या हस्ते कार्यक्रमचे उद्घाटन करण्यात आले. तसेच साडी डे च्या निमित्ताने विरांगना झलकारी बाई संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या आँनलाइन व्हाटसअप गृपच्या स्पर्धेत बक्षीसे ही वाटण्यात आले. तसेच महीलांसाठी तनावमुक्त म्हणुन झलकारी बाई संस्थेच्या अध्यक्षा व कार्यक्रमाच्या आयोजक गीतांजली कोळी यांनी महीलांना सशक्तिकरणचा संदेश देऊन महाराष्ट्रात तरूणाईची वाढती व्यसानाधिनता यावर चिंता व्यक्त करून प्राचीन काळापासून ते आतापर्यंत च्या भारतातील शुर, साहसी महिलांचा संदेश दिला.