भिम साम्राज्य क्रीडा मंडळाच्या अध्यक्षपदी आकाश अवसरमोल यांची निवड
मेहकर (प्रतिनिधी) स्थानिक मेहकर येथे भिम साम्राज्य क्रीडा मंडळाची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा. संजय वानखेडे जिल्हा विद्युत नियंत्रण समितीचे सदस्य हे होते तर भिम साम्राज्य क्रीडा मंडळाचे मार्गदर्शक प्रा. बाळू अंभोरे हे होते. सदर या बैठकीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरा करण्यासाठी यावर्षीच्या भिम साम्राज्य क्रीडा मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध शहर युवक भीमशक्तीचे अध्यक्ष आकाश अवसरमोल यांची निवड करण्यात आली.
यावेळी भीम साम्राज्य क्रीडा मंडळाच्या उपाध्यक्षपदी रवी पवार, तर कोषाध्यक्षपदी शुभम खिल्लारे, सचिवपदी करण देबाजे, रवी डुकरे, निखिल गवई ,आदित्य मोर, धिरज गवई, आकाश साबळे, अनुप देबाजे अक्षय पवार, दीपक अवसरमोल, अंकुश खंडारे, अमर गवई, सागर गायकवाड, सौरभ कळंबे, प्रतिक पाखरे, महेश नेमाडे, प्रफुल देवाजे, अतुल गवई, हर्ष अंभोरे, शुभम प्रधान, विशाल गायकवाड, सुरज गवई, सागर गवई, सुमेध वानखेडे, शुभम साबळे, सिद्धार्थ गवई आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन रवी डुकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन भीम साम्राज्य क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आकाश अवसरमोल यांनी मानले.