महाराष्ट्र
स्पीड न्यूज प्रतीनिधीच्या ऑनलाईन तक्रारीचे नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांनी केले निरासरण
नाशिक (प्रतिनिधी) नाशिक शहरातील मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या नंदिनी नदीच्या पात्रात साठलेल्या कचऱ्याबाबत स्पीड न्यूज चॅनलचे प्रतिनिधी मनोज साठे यांनी महापालिकेच्या ऑनलाइन पोर्टलवर तक्रार दाखल केली होती. तसेच स्पीड न्यूज च्या वेब न्यूजवर बातमी प्रसारित केली होती. त्यांच्या या तक्रारीची दखल घेत नाशिक महापालिका अधिकाऱ्यांनी, सफाई कर्मचाऱ्यांना सूचना देऊन नंदिनी नदी पात्रातील बहुतांश कचरा गोळा करून त्याचे व्यवस्थापन केले व काही दिवसात शक्य तेवढे नदी पात्र स्वच्छ करू असे आश्वासन स्पीड न्यूजचे प्रतिनिधी मनोज साठे यांना दिले.
महापालिकेच्या सहकार्याबद्दल मनोज साठे यांनी आभार मानले आहेत व यापुढेही अश्याच प्रकारचे इतर सामाजिक प्रश्न आपण आपल्या स्पीड न्यूज चॅनलवर मांडत राहू व त्याला न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करू असे मत त्यांनी मांडले.