महाराष्ट्र
सटाणा दोद्धेश्वर परीसरात बिबटयाचा मुक्तसंचार
सटाणा (प्रतिनिधी) येथील सटाणा दोद्धेश्वर रस्त्यालगत असणाऱ्या शेतशिवार, घाट परिसरात बिबटयाच्या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यामूळे शेतात घर करून राहणाऱ्या नागरिकांचें जनजीवन विस्कळित झाले आहे त्यामूळे वनविभागाने ताडतडीने पिंजरा बसवावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याचीही भीती
परिसरातील नागरिकाचा शेती मुख्य व्यवसाय असल्याने येथील शेतात घर करून राहतात. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय, गोट फार्म, कुकट पालन असे अनेक व्यवसाय सुरु केले आहे. परंतु बिबट्याने पाळीव प्राण्यांना लक्ष्य केल्याने शेतकऱ्यांचें आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.