दारूबंदी साठी गावोगावी, शिंदखेडा तालुक्यातील मागासलेले गाव नवे आच्छी…!
मालपूर (गोपाल कोळी) दि. 19/3/2022 करोनाचा कहर कमी झाला शहरे खेडी सर्वसामान्य जनजीवन सुरू झाले आता माझे करोनाच्या रुग्णांच्या मदतीचे, दवाखान्याचे काम भरपूर कमी झाले. आता किराणा दुकानात वाईन विक्रीच्या विरोधात लढेही करून झाले… अजूनही जो पर्यंत महाराष्ट्र सरकार हा चुकीचा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार पण आता पुन्हा खेडोपाडी दारूबंदी विषयी जनजागृती, व्यसनमुक्ती साठी मार्गदर्शन, समाज प्रबोधन अशी पक्की समाजसेवेच्या व्रताची गाठोडे मनात बांधून निघाले… धुळ्याहून बस कमी असल्याने किलीपीली गाडी ने नरडाणा नरडाणा हून शिंदखेडा, शिंदखेडा हून विरदेल तेथून कार्यकर्ते महेश कोळी, गोपाळ चव्हाण, विशाल ईशी राकेश कोळी, गौरव चव्हाण यांच्या सोबत अतिशय दुर्गम, दुर्लक्षित, मागासलेले 90/.टक्के आदिवासी टोकरे कोळी वस्ती असलेले गाव संध्याकाळी पाच वाजता नवी आच्छी गाठले…
रस्याने विरदेल पासून हाच्छी पर्यंत अतिशय खराब रस्ता… डांबरी रोड चे नामोनिशाण नाही इकडे गावे असावीत का असा ते मातीचे ओबडखाबड रस्ते बघून प्रश्न पडला फेसबुक लाईव्ह करण्यासाठी रेंज पण लवकर इकडे येत नाही… जवळच तापीचे पात्र तापी नदीच्या काठावर तिथले निसर्गाचे रक्षण करणारे सानिध्य संस्कृती जपणारे आदिवासी कोळ्यांचे अनेक गावे तापी नदी काठावर असतांना देखील प्रामाणिक पणे शेती, मजूरी, शेळ्या , गुरे पाळून कष्टमय प्रामाणिक टोकरे कोळींच्या नशीबी कष्टच आणि जवळच असणाऱ्या तापी नदीच्या पात्रातून सतत उपसा करत चोरटे वाळू माफियांनी येथील रस्यांची मोठमोठे वाहणे या रस्त्यावर पळवून पुर्ण वाट लावून टाकली आहे…
या भागात योजना येतात अन जातात कुठे ,प्रशासन कुठे वचक का नाही… सतत वाळूमाफिया कडून चोरटी वाळू वाहतूक… करोडोत खेळणारे वाळू माफिया दलाल आणि ज्यांचा तिथ रहीवास त्यांना वनवास…. मुलांना शाळेत जायला धड जाता येत नाही.विरदेल पासून नवी आच्छी,जुनी आच्छी संपुर्ण रस्ताभर कुठे डांबराचा एक तुकडा सुध्दा डोळ्याला दिसणार नाही…. आच्छी गावात पोहचल्यावर सर्वात आधी महीलांची एकच आर्जव विनंती “काहीपण करा ताई आम्हना गावना साठे रस्ता चांगला होवासाठे कोशीस करा “…. किती दुर्दैव साधा आठ दहा किलोमीटरचा रस्ता कोणत्याही निवडून आलेल्या आमदारांनी खासदारांनी, पंचायत समिती सदस्यांनी, जि. प. सदस्यांनी चांगला होण्यासाठी प्रयत्न करू नये तेही अनेक वर्षानुवर्षे पासून… वाळूमाफिया ंचा बंदोबस्त करण्यासाठी यंत्रणा कमी पडावी एवढा मोठा हौदोस सुरू आहे… हाच आक्रोश गावकऱ्यांचा रस्ते मुळे विकास नाही गावात चौकात लाईट नाहीत. कोणत्याही आदिवासी च्या सुविधा नाहीत… शिक्षणाचे प्रमाण कमी, व्यसनाधीनता वाढलेली, पोट भरणे भाग आहे म्हणून हताशपणे मिळेल ते कामे करून पोट भरायचे उदरनिर्वाह चालवायचे.. कितीक निवडणूक येतात जातात… आजही तापीकाठावरील नवी जुनी आच्छी गावे दुर्लक्षित, अविकसित,हताश ग्रामस्थ दारूबंदी गावात होण्यासाठी सर्वाची सहमती.. .. प्रश्नांची सरबत्ती माझ्या उत्तरांची जुळवाजुळव तरीही सर्वातून मार्ग काढून दारूबंदी जनजागृती,समाजजनजागृतीतून, गावातील महीलांना,तरूणांना हिम्मत देऊन मार्गदर्शन करून… गावातील रावसाहेब कोळी, प्रकाश कोळी या उमद्या तरूणांना, महीलांना अजून सशक्त बनून हक्कांसाठी लढण्याचे आवाहन करून पुन्हा त्याच खडतर रस्यांवरून कार्यकर्ते यांना सोबत घेऊन माघारी परतले….
गीतांजली कोळी, धुळे
प्रमुख-महाराष्ट्र दारूबंदी महीला/युवा मोर्चा
संस्थापक/मार्गदर्शक-वाल्या सेना गृप महाराष्ट्र