शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांचा सोनगीर महावितरण कंपनीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना घेराव
शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी
शिंदखेडा (यादवराव सावंत) तालुक्यातील शेतकऱ्यानी आज कमी दाबाचा वीजपुरवठा व अनियमित वीजपुरवठा हयामुळे त्रस्त असलेल्या डोंगरगाव, कंचनपुर , वाघाडी येथील शेतकऱ्यांनी सोनगीर महावितरण कंपनीच्या कार्यालयात अधिकारी यांना घेराव घातला. ऐन उन्हाळ्यात पाण्याची गरज असताना पिकांना पाणी देण्यात अडचणी येत असल्याचे शेतकऱ्यांनी अधिकारी यांना सांगितले.
यावेळी सहायक अभियंता हेमंत अहिरे यांनी शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेत नरडाणा येथील उपकार्यकारी अधिकारी गणेश अस्मार हयांना बोलावून मार्ग काढण्याचे सांगितले. हयाप्रसंगी धुळे जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील, माजी उपसरपंच अशोक पाटील, पत्रकार आर.पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष आर.जी.खैरनार, कंचनपुरचे शानाभाऊ पाटील, विजय पाटील ,गुलाब पाटील, वाघाडी चे सोनु पाटील, राजेंद्र पाटील, रवींद्र पाटील, ईश्वर पाटील, दिनकर पाटील, भजवान पाटील, सरपंच नेहरू पाटील, साहेबराव पाटील, संजय पाटील,किरण शेवाळे, प्रभाकर पाटील, अरुण पाटील, निंबा पाटील, महेंद्र जाधव, रावसाहेब पाटील, ईश्वर पाटील, भटु जाधव, नामदेव जाधव, किरण जाधव, ज्ञानेश्वर जाधव, सुरेश पाटील, महेंद्र पाटील, सुरेश पाटील आदी शेतकरी सहभागी झाले होते.