युध्दनितीचे जनक शिवाजी महाराज : प्रा. धनंजय जवळेकर
चोपडा (विश्वास वाडे) पंकज कला व विज्ञान महाविद्यालय चोपडा इतिहास विभाग, विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. महादेव वाघमोडे तर मार्गदर्शक म्हणून प्रा. धनंजय जवळेकर हे लाभले होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दिलीप गिर्हे यांनी केले महापुरुषांच्या जयंती साजरी करून त्यांच्या विचारांची रुजवण अशा कार्यक्रमातून होत असते शिवाजी महाराजांच्या एकंदरीत जीवन आत्मसात करून त्या मार्गाने जीवन जगण्यास मानवी जीवन सुकर होईल असे प्रतिपादन केले.
छत्रपती शिवाजी महाराजांची गनिमी कावा युद्धनीती या विषयावर प्रा. धनंजय जवळेकर इतिहास विभाग प्रमुख श्री संत गजानन महाराज महाविद्यालय खर्डा यांनी ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराज युद्धनीती चे जनक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना भगव्या झेंड्याखाली आणून महाराष्ट्रात सुशासन निर्माण करण्याचे काम त्या काळात केले. पाच शाह्या व मोगल रेशनला नमुन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले अंतर्गत बंडाळ्या व प्रशासनातील अडथळे दूर करून शिवाजी महाराजांनी युद्ध कलेच्या साह्याने महाराष्ट्रात न व शासन निर्माण केले. चंद्रराव मोरे यांचा पाडाव, अफझलखान प्रकरण, शाहिस्तेखानाचा बंदोबस्त, सिद्दी जोहरची पन्हाळा मोहिम व सुरतेची बे सुरत इत्यादी मोहिमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्धनीतीचा अवलंब करून महाराष्ट्रातील दुष्मनाला नमुन्याचे काम शिवाजी महाराजांनी केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. महादेव वाघमोडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण, स्त्री विषयक धोरण, जलनीती, मावळ्यांप्रती असलेली आस्था, शेतकऱ्यांविषयी असलेली आस्था, शेत सारा, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागणार नाही याचे उदाहरण देऊन शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किशोर पाठक तर आभार प्रा. अजय पाटील यांनी मानले कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते.