आमदारांनी पाळला आमदार होण्यापूर्वीचा शब्द
वैजापुर (गहिनीनाथ वाघ) तालुक्याचे लाडके आमदार रमेश बोरणारे हे एकदा प्रचारादरम्यान वैजापूर तालुक्यातील गोळवाडी येथे आले असता त्यांनी बाबूलाल तुकाराम मांजरे यांच्या शेत वस्ती वरती असणाऱ्या गणपती मंदिरासाठी सभामंडप देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी भाषण करत असताना सांगितले की मी जे आश्वासन दिले होते ते आश्वासन पूर्ण करण्याची संधी मला गणपती बाप्पानी व तमाम वैजापूर तालुक्यातील मतदाराच्या आशीर्वादाने मिळाली व मी दिलेला शब्द पाळला.
गणपती मंदिरासाठी पाच लाखाचा सभामंडप बांधून दिला म्हणून मला मी दिलेल्या शब्दाचा विसर न पडता मी तो पूर्ण केला मला याचे समाधान आहे. कार्यक्रमास उपस्थित उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, तालुकाप्रमुख सचिन वाणी, माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी मिसाळ उपनगराध्यक्ष साबेर, शहर प्रमुख राजेंद्र साळुंखे, माजी सरपंच किरण पद्माकर, पगार व समाजसेवक बाबासाहेब निवृत्ती शिंदे हे उपस्थित होते.