वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांचा जन्मोत्सव सोहळा शेळगाव गावात उत्साहात साजरा
देगलूर (प्रतिनिधी) शेळगाव नृसिंह ता. देगलुर जि. नांदेड येथे वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या जयंती निमित्त महारक्त दान शिबिर २९ लोकांनी रक्तदान केले आहे. त्यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि व्याख्यान माला आयोजित करण्यात आले होते.
या वेळी मार्गदर्शन करण्यासाठी सद्गुरू श्री शिवानंद शिवाचार्य महाराज तमलुरकर, प्रमुख भाजपचे प्रदेश निमंत्रित सदस्य रामदास पाटील सुमठानकर, शिव व्याख्याते शिवानंद हेबतपुरे उपस्थित होते. यावेळी दिनेश आप्पा आवडके, संतोष पाटील येरगीकर यांची सुद्धा उपस्थिती होती. सुत्र संचालन बसवंत पाटील शेळगावकर आणि प्रस्तावना माधव पाटील तर आभार प्रदर्शन शिवकुमार देवाडे यांनी केले. या कार्यक्रमाला गावातील सर्व गावकरी उपस्थित होते. हा कार्यक्रम डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज विचार मंच व समस्त गावकरी मंडळी शेळगाव (नृसिंह) ता. देगलूर जि. नांदेड यांनी आयोजन केले होते.