काळखेडा येथील जी.जो.अग्रवाल मराठा बोर्डींगच्या माजी विद्यार्थ्यांचे उद्या स्नेहसंमेलन
धुळे (प्रतिनिधी) काळखेडा येथील जी.जो.अग्रवाल मराठा बोर्डींगच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उद्या रविवार दि. २७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान हे स्नेहसंमेलन गावातील कै. बापुसो. नारायण भूरमल पाटील शैक्षणिक संस्थेत होणार आहे. त्यात माजी विद्यार्थ्यांच्या सत्कारासह परिचय व चर्चासत्र होईल. परिसरातील सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकार्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन वि.ज.भ.ज प्राथमिक आश्रमशाळेचे अध्यक्ष तथा धुळे तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक शांताराम भूरमल पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.
जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या हॉलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शांताराम पाटील यांनी सांगितले की, कोरोनामुळे आपण अनेकांना गमावले. कोरोनानंतर अनेकांचे जिवनमान, परिस्थिती बदलली आहे. शाळाही मोठ्या कालावधीसाठी बंद होत्या. त्यामुळे बोर्डींगच्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणून भेटीसह त्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभावे, अनुभव कळावे, म्हणून या स्नेहसंमलेनाचे आयोजन करण्यात आले आहे. बोर्डींगचे अनेक विद्यार्थी आज डॉक्टर, वकील, उद्योजक अशा मोठ्यापदांवर आहेत. त्याकाळात त्यांनी आपल्या आई-वडीलांपासून दुर राहून शिक्षण घेत या पदांपर्यंत झेप घेतली आहे. त्यामुळे त्यांचे अनुभव, अनमोल विचार विद्यार्थ्यांना कळावे म्हणून चर्चाचत्र ही होणार आहे. त्याचा विद्यार्थ्यांना लाभ होईल. दरम्यान सकाळी ८ ते ५ वाजेदरम्यान होणार्या या मेळाव्यात प्रथम दिवंगत माजी विद्यार्थ्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात येईल. त्यानंतर उपस्थित माजी विद्यार्थ्यांना सत्कार सोहळा, परिचय व दुपारी दोन वाजता चर्चासत्र होणार आहे. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.