महाराष्ट्र
वैजापूर तहसील कार्यालयावर भ्रष्टाचारविरोधी जनशक्ती आयोजित शेतकरी आंदोलन
वैजापूर (गहिनीनाथ वाघ) वैजापूर तहसील कार्यालयावर भ्रष्टाचारविरोधी जनशक्ती आयोजित शेतकरी आंदोलन करण्यात आले. खरीप हंगामाच्या पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आज १५० वा दिवस उजाडून सुद्धा तहसीलदार राहुल गायकवाड हे काही ठाम भूमिका घेत नसून शेतकऱ्यांची थटा केली जात आहे. म्हणून ७ मार्च २०२२ रोजी १६५ दिवस पूर्ण होणार आहे. जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर वैजापूर तहसीलला ताळे ठोकणार, असा इशारा राष्ट्रीय भ्रष्टाचार महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रियाज खान पठाण यांनी दिला आहे.