शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आरोग्य वर्धनी दिवस साजरा
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे विखरण प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत भडणे येथील उपकेंद्रात आयुष्यमान भारत आरोग्य वर्धनी दिनानिमित्त भडणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर राहुल तळवी व आरोग्य सेविका कविता बोरसेयांच्या उपस्थित गरजू रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली.
यावेळी गावातील जेष्ठ नागरिकांचे ब्लड प्रेशर अस्तमा कुष्ठरोग, आजाराबद्दल माहिती देण्यात आली व त्यांची रक्तचाचणी तसेच ब्लड शुगर तपासण्यात येऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून आरोग्य विषयी यावेळी मार्गदर्शन डॉक्टर राहुल तडवी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच अशोक पाटील, ज्येष्ठ नागरिक विक्रम पाटील व भडणे येथील पोलिस पाटील युवराज माळी, आरोग्य सेविका कविता बोरसे, डॉ. राहुल तळवी, उषाबाई शिंदे पुष्पाबाई पाटील, कल्पना पाटील, नानू मंगळे, नागो पाटील, सुदाम रमेश पाटील, रामचंद्र पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक यांची 40 लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.