देगलूर फार्मर प्रोड्युसर कंपनी लि.तर्फे नाफेडची हरभरा नोंदणीला सुरुवात
देगलूर (प्रतिनिधी) तालुक्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी नाफेडच्या वतीने हरभरा खरेदीस सुरुवात होत आहे. त्यामुळे आपल्याकडील असलेले हरभरा विक्रीसाठी नाव नोंदणी सुरुवात करण्यात आली आहे. तालुक्यातील हरभरा उत्पादक शेतकरी आपली नाव नोंदणी करून घ्यावी,असे आवाहन नाफेडच्या वतीने करण्यात आले आहे.
देगलूर तालुक्यातील सर्व हरभरा उत्पादक शेतकरी बंधूंना कळविण्यात आले की,नाफेड खरेदीसाठी हरभरा नोंदणी सुरू करण्यात आली आहे.हरभरा ५ हजार २३० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे हमी भाव देण्यात येणार आहे. हरभरा विक्रीसाठी देगलूर फार्मर प्रोड्युसर क ली तालुका देगलूर येथे नोंदणी १६ फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आली आहे.नाफेड खरेदी हंगाम२०२१-२२ मध्ये शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत नाफेडच्या व महाएफपीसीच्या वतीने हरभरा खरेदी सुरू करण्यात येणार आहे.
तालुक्यातील हरभरा उत्पादक व इच्छुक शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर येऊन हरभरा विक्री करीता नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणीकरीता आधार कार्ड, बँक पासबुक(जनधन खाते चालणार नाही),सातबारा उतारा, पिक पेरा लावलेला कागदपत्रे आवश्यक असल्याचे आवाहन देगलूर फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. च्यावतीने करण्यात आले आहे.