नवाब मलिक यांचा राजीनामा झालाच पाहिजे ; भाजपचे तहसीलदार यांना निवेदन
चोपडा (विश्वास वाडे) प्रथम छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात घोषणा देऊन ठाकरे सरकार हाय हाय भष्टाचारी नवाब मलिक यांचा राजीनामा झालाच पाहिजे, अश्या जोरदार घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक गजबजून गेला नंतर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनातले मुद्दे
काल ईडीने 1993 बॉम्बस्फोटातील सहभागी गुन्हेगारांशी संबंधित मनी लाॅडरिंग प्रकरणी अटक (नवाब मलिक) यांना अटक केली. कोर्टाने त्यांना 3 मार्च प्रर्यत कोठडी दिली. अनिल देशमुखाचा राजीनामा घेणारा शरद पवार साहेब नवाब मलिक यांच्या बाबतीत वेगळा निर्णय करत आहेत यावरून एक सिद्ध होते की एका विशिष्ट समुदायाला दुखावणे त्यांना जमणार नाही पण महाराष्ट्रातील राष्ट्रीय विचारांची जनता हे सहन करणार नाही. महाविकास आघाडी मध्ये सगळे चोरटे व आतंकवादी लोकांची भरती झालेली आहे. काही बेल वर काही जेलमध्ये तर काही जेलमधुन सुटलेले चोरटे महाविकास आघाडीमध्ये आहेत. महाविकास आघाडी हा राजनीतीक पक्ष आहे का चोर बलात्कारी आतंकवादी ला सपोर्ट करणारा पक्ष आहे हे आज प्रयत्न महाराष्ट्रातील लोकांना कळत नाही असे एक ना अनेक मुद्दे निवेदनात आहेत.
यावेळेस उपस्थित तालुका अध्यक्ष पंकज पाटील, शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल, युवा मोर्चा ता अध्यक्ष प्रकाश पाटील, जि प सदस्य गजेंद्र सोनवणे, प स सदस्य भरत बाविस्कर, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र मराठे, बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा सदस्य लक्ष्मण चौधरी, सरचिटणीस हनुमंत महाजन, सरचिटणीस चंद्रकांत धनगर, सरचिटणीस मनोहर बडगुजर, सरचिटणीस सुनिल सोनगिरे, युवा मोर्चा ता उपाध्यक्ष विवेक गुजर, बेटी बचाओ बेटी पढाओ ता अध्यक्ष संभाजी पाटील, युवा मोर्चा ता सरचिटणीस अमित तडवी, शेतकी संघ संचालक हिंमतराव पाटील, बापुराव पाटील, मयुर सुर्यवंशी, दिनेश मराठे, अनिल पाटील, किसान मोर्चा ता उपाध्यक्ष बारकु पाटील, दिपक चौधरी, राजेश खैरनार, मोतीलाल सोनवणे, रणछोड पाटील यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.