रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा..!
अमरावती (महेंद्रसिंग पवार) काल सायंकाळी ६ च्या सुमारास शक्ति फ़ाउंडेशनचे उपाध्यक्ष रामबाबा बघेल यांना परतवाडा पोलिस स्टेशन मधुन नाज़िम यांचा फ़ोन आला. त्यांनी कळवले की सफ़ेद पुल,परतवाडा येथे एक लावारिस अज्ञात आदिवासी वृद्ध व्यक्ति पुलावरुन पड़ला आहे. माहीती कळताच रामबाबा बघेल यांनी शक्ति फ़ाउंडेशनचे चार पाच कार्यकर्ते एकत्र करुन अपघातास्थळी धाव घेतली.
तेथे पोलिस बांधवांच्या सहकार्याने त्या व्यक्तिस सुखरूप बाहेर काढ़ण्यात आले आणि शक्ति फ़ाउंडेशनच्या निशुल्क ऐम्ब्युलन्समध्ये त्या व्यक्तिस अचलपुर ग्रामीण रुग्णालय येथे सुखरूप पोहचविण्यात आले. आज शक्ति फ़ाउंडेशनच्या निशुल्क ऐम्ब्युलन्स सेवेचा गरीब, निराधार आणि ग़रजू नागरिकांना खुप फ़ायदा होत आहे. हे पाहुन परतवाडा अचलपुर शहरातील सर्व नागरिक शक्ति फ़ाउंडेशनचे अध्यक्ष आणि भाजपा शहरउपाध्यक्ष ठाकुर श्यामसिंह गड्रेल यांचे आभार मानत आहे.