अखेर चैनपूर येथे स्मशानभूमी मंजूर ; ग्रामपंचायत सदस्य हाणेगाव मारोती यांच्या प्रयत्नांना यश
देगलुर (प्रतिनिधी) देगलूर तालुक्यातील चैनपूरची लोकसंख्या चार हजार च्या जवळपास असून आज तागायत गावातील लोकांना अंत्यविधीसाठी स्मशानभूमी उपलब्ध नव्हती. त्याचे कारण आजपर्यंत सत्ताधाऱ्यांनी त्यासाठी पाठपुरावा केलेला नव्हता, म्हणून गावातील विकास कामे डोळ्यासमोर ठेवून गावातील सुशिक्षित, वंचित, लोकांना सोबत घेऊन चैनपुरच्या विकासासाठी चैनपुर विकास पॅनल ची सुरुवात करण्यात आली.
गावातील जनतेने ग्रामपंचायत निवडणुका मध्ये पूर्ण विश्वास ठेवून भरघोस मतांनी चैनपुर विकास पॅनल ला स्पष्ट बहुमत दिले परंतु काही व्यक्ती द्वेषी, विचारहीन, संकुचित लोकांनी चैनपुरच्याच नव्हे तालुक्यातील ग्रामीण भागातील राजकारणाला काळिमा फासणारी घटना घडून आणली त्यामध्ये निवडून येण्याची क्षमता तर नाहीच, परंतु विचारही व्यक्तीला निवडून आल्यानंतर दुसऱ्या पॅनल मध्ये घेऊन सत्ता स्थापन केले. परंतु आज पर्यंत एक ते दीड वर्षांमध्ये एकही रुपयाचे काम केलेले नाही.व चैनपुरचा विकास रोखण्याचे पाप त्यांनी केले. परंतु पॅनल प्रमुख लक्ष्मण बोरवाड, विठ्ठल देशमुख, सुभाष पाटील,अनिल हनेगावे, पापंना दंडलवाड, बालाजी माळगे, राजू कोळनुरे, उत्तम मुंडकर, विठ्ठल कायतवाड, सुभाष मदनुरे, गुंडू पिंडकुरे, यासारख्या अनेकांनी कायमचं चैनपुरच्या विकासासाठी मागे न हटता निराश न होता स्मशानभूमी, आरोग्य , शिक्षण, पाणी, रस्ते, विज या सुखसोई मिळविण्यासाठी चंद्रकांत पाटील, हणेगावे मारोती यांच्या नेतृत्वामध्ये प्रशासनाला उपोषणाच्या माध्यमातून, निवेदने, पाठपुरावा, आमदार व पालकमंत्री यांच्याकडे देऊन अखेर जिल्हाधिकारी नांदेड यांनी चैनपूर येथे समशानभूमी मंजूर केले. यामुळे चैनपुरची कायमची स्मशानभूमी चा प्रश्न मिटलेला आहे.या मध्ये गावातील सर्व लोकांचा सहभाग असून गावकऱ्यांच्या वतीने प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याचे कौतुक केले जात आहे. व गावातील सर्व लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.