महाराष्ट्र
धूलिवंदनाच्या दिवशी मद्य विक्री बंदचे आदेश
धुळे (विक्की आहिरे) जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मद्य विक्री धूलिवंदनाच्या दिवशी (शुक्रवार १८ मार्च) रोजी पूर्ण दिवस बंद ठेवण्यात यावी असे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत. बंदच्या दिवशी दुकाने उघडी आढळल्यास त्यांची अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी शर्मा यांनी म्हटले आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व मद्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना आवाहन करण्यात आले आहे.




