बिलोली शहरातील भौतिक सुविधा उपलब्ध करुन द्या ; ऑल इंडिया तंजिम ए इंसाफची मागणी
नांदेड (प्रतिनिधी) बिलोली शहरातील अनेक भौतिक सुविधा अभावी नागरिकांना नाहक्क त्रास सहन करावा लागत आहे. अशा विविध मागणीचे निवेदन ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफ या सामाजिक संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी तथा न.प प्रशासक सचिन गीरी यांच्याकडे करण्यात आली.

मागण्या खालीलप्रमाणे
जुना बसस्थानक येथे प्रवाशांसाठी बसण्यासाठी शेड (बस्थानक) उभारण्यात यावे, शहरातील बोधन मार्गावरील नाली व डिव्हायडरचे कामे राहिले आहेत ते त्वरीत पुर्ण करण्यात यावेत, राज्य महामार्गावरील बंद असलेले पथदिवे चालू करण्यात यावेत. (न.प. समोर, बस स्थानासमोर व देशमुख नगर समोरील),शहरातील नवीन बस स्थानक व जुना बस स्थानक येथे सार्वजनिक मुतारीची व्यवस्था करण्यात यावी, देशमुख नगर येथील नालीवरील तुटले स्लॅप तात्काळ नवीन टाकण्यात यावेत,तुकाराम नगर व प्रशांत नगर येथे राहिलेले रोड व नालीचे कामे तात्काळ करण्यात यावे ,जुनी नगर परिषदेच्या जागेवर फळ व भाजीपाला व्यापाऱ्यांसाठी जागा खुली करण्यात यावी, आदी मागणी करण्यात आल्या. तसेच वरील मागण्याच्या संदर्भात तात्काळ कोणतीच कार्यवाही नाही झाल्यास दिनांक 14/3/2022 रोजी अमरण उपोषण करण्यात येईल. असा इशाराही देण्यात आले. निवेदनावर अॉल इंडिया तंजिम ए इंसाफचे बिलोली तालुकाध्यक्ष ए.जी कुरेशी, सचिव सय्यद रियाज, उपाध्यक्ष रफीयोद्दीन इनामदार, सदस्य मोहसिन खॉन आदींच्या स्वाक्षरी आहेत.



