देवपूर शिवसेनेचा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांना दाखविला ‘पावनखिंड’ मराठी चित्रपट
धुळे (स्वप्नील मराठे) देवपूर शिवसेनेकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य निर्मितीतील एका प्रमुख घटनेवर आधारित ‘पावनखिंड’ हा मराठी चित्रपट दाखविण्याचा अभिनव उपक्रम राबविला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य, पराक्रम देश, राज्य, जिल्हा तसेच शहरातील समस्त नवीन पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. या सर्व बाबी ‘पावनखिंड’ या चित्रपटात उत्तमरित्या चित्रित करण्यात आलेल्या आहेत. यासाठी १ ते १० वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिवसेना उपमहानगर प्रमुख ललित माळी व हरिष माळी यांनी पुढाकार घेऊन ‘पावनखिंड’ हा मराठी चित्रपट दाखविला. याप्रसंगी उत्तर महाराष्ट्राचे युवा सेना सचिव आविष्कार भुसे, माजी विरोधी पक्षनेते गंगाधर माळी, जिल्हा संघटक धीरज पाटील, युवा सेना सहसचिव पंकज गोरे, माजी महानगरप्रमुख प्रफुल्ल पाटील, अॅड. संजय बाविस्कर, माजी नगरसेवक चंद्रकांत गुरव, माजी नगरसेवक शेखर दुसाने, नितीन शिरसाठ, सोनी सोनार, दक्षता पाटील, नेहा वाघ, अॅड. जगदीश सूर्यवंशी, कैलास बापू मराठे, विनोद
जगताप, दिनेश माळी, मोहित वाघ, हृषिकेश महाजन, आनंद माळी, राम माळी, वैभव महाजन, रोहित अमृतकर, पिंदू चौधरी, सिध्देश बागुल, सिध्देश नाशिककर, अथर्व अमृतकर, अक्षय मोरे, जितेंद्र पाटील, अमित खंडेलवाल आदी उपस्थित होते.