शिंदखेडा येथील नगरपंचायत वतीने शहरातील घरगुती नळ कनेक्शन कट करणेबाबत धडक मोहीम
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील नगरपंचायत च्या वतीने शहरातील गावठाण भागातील वर्षानुवर्ष नगरपंचायत चा मालमत्ता कर व पाणीपट्टी कर न भरणाऱ्या मालमत्ता धारकांवर मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे तसेच कर निरीक्षक वामन अहिरे यांच्या नेतृत्वाखाली धडक वसुली मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत वर्षानुवर्ष नगरपंचायतीचा मालमत्ता कर व पाणीपट्टी कर न भरणाऱ्या पहिल्या दिवशी 16 मालमत्ता धारकांवर नळ कनेक्शन खंडित करण्यात आले. तसेच ज्या भागातील 60% पेक्षा अधिक नागरिकांकडे कराची रक्कम थकलेली आहे. अशा भागातील सात ते आठ बोअरवेल चे कनेक्शन देखील खंडित करण्यात आलेले आहे.थकित रकमेचा भरणा केल्याशिवाय सदर कनेक्शन जोडता येणार नाही.तरी मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांनी याद्वारे शहरातील सर्व मालमत्ता धारकांनी लवकरात लवकर थकित रकमेचा भरणा करून नगरपंचायत प्रशासनास सहकार्य करावे अन्यथा यापुढे कार्यवाही अधिक कडक करण्यात येणार असल्याचे बजावले आहे.यासाठी वसुली पथक विवेक डांगरीकर, शाम भोई, सुनील राजपूत, अशोक भामरे, अबु हसन शेख, अनिल माळी, शकील मेहतर, अजय डोढवे महिला प्रतिनिधी सारिका वाघ, सोनी वाघ, शकीला मेहतर, सायरा मेहतर आदीनी सहकार्य केले.