महाराष्ट्र

श्री मंगळदेव ग्रह मंदिरात तुलसी विवाह महा सोहळा थाटात संपन्न

रोज महाप्रसाद सेवेसाठी भव्य स्वयंपाक गृहाचे भूमिपूजन

अमळनेर : युवराज पाटील , तालुका प्रतिनिधी
अमळनेर : भारतीय संस्कृतीमध्ये तुलसी विवाहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुलसी विवाहानंतर वधू- वरांच्या ब्रह्मगाठी विवाह सोहळ्यातून बांधल्या जातात. ही परंपरा टिकून राहावी, मंदिरात मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या विवाह इच्छुकांच्या इच्छापूर्तीसाठी परमेश्वराची विशेष आराधना करावी , या उद्देशाने मंगळग्रह सेवा संस्थेने श्री मंगळदेव ग्रह मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भव्य प्रमाणात तुलसी विवाहाच्या महासोहळ्याची परंपरा सुरू केली आहे . गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे हा कार्यक्रम अत्यंत मर्यादित स्वरूपात होत होता. यावर्षी मात्र कोरोनाचा कहर बऱ्यापैकी ओसरल्याने हा विवाह महासोहळा भव्य प्रमाणात करण्यात आला .
प्रारंभी वराच्या विषयातील श्रीकृष्णाच्या मूर्तीची सजवलेल्या रथात व श्री मंगळदेव ग्रहाची उत्सव मूर्ती असलेल्या पालखीची मंदिर परिसरात वाजत- गाजत जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. डॉ. अक्षय कुलकर्णी व निवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील यांनी सपत्निक पालखी पूजन केले.
प्रांताधिकारी सीमा अहिरे विवाह महासोहळ्याचे मुख्य यजमान होते. अन्य ११ मानकऱ्यांमध्ये आमदार अनिल पाटील, निवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील,पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, धुळे येथील सीए गोविंद गिनदोडीया माजी नगरसेवक प्रताप साळी,माजी नगरसेवक ऍड .सुरेश सोनवणे, डॉ.अक्षय कुळकर्णी,डॉ.दिनेश पाटील,बाजार समितीचे माजी संचालक पराग पाटील,बांधकाम साहित्य व्यवसाहिक दामुशेठ गोकलाणी यांचा समावेश होता. जेष्ठ नेते जयवंतराव पाटील व लायन्स क्लबचे अध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी वर व वधूच्या मामाची भूमिका निभावली.
विवाह महा सोहळ्यानंतर मंदिरात महाआरती झाली. त्यानंतर पुढील वर्षापासून मंदिरात दररोज भाविकांसाठी प्रसाद सेवा सुरू होणार आहे. त्यासाठी मंदिराच्या पाठीमागे भव्य व अद्ययावत स्वयंपाकगृहाचे भूमिपूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मंदिरासाठी लवकरात लवकर भरीव निधी आणणार असल्याचे यावेळी आमदार पाटील यांनी सांगितले.
संतश्री लोकेशानंद महाराज यांनी विवाह महासोहळ्याच्या प्रारंभीच येऊन देवदर्शन केले. सोहळ्याला शुभेच्छा दिल्या व उपस्थितांना आशीर्वाद दिले.
यावेळी माजी आमदार स्मिता वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील, ‘ लोकमत ‘ चे संपादक रवी टाले , जनरल मॅनेजर गौरव रस्तोगी , जेष्ठ वितरण व्यवस्थापक राजेश सुर्यवंशी, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, जेष्ठ नेत्या अॅड. ललिता पाटील, तिलोत्तमा पाटील, सुलोचना वाघ , खान्देश शिक्षण मंडळाचे चेअरमन जितेंद्र जैन , संचालक योगेश मुंदडे ,नीरज अग्रवाल, कल्याण पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील,शहराध्यक्ष मुक्तार खाटीक,भाजप चे शहराध्यक्ष उमेश वाल्हे, सर्वच समाजांचे पंच मंडळे आदींसह खूप मोठ्या संख्येने भाविक स्त्री-पुरुष उपस्थित होते.
सुमारे पाच हजार भाविकांनी श्री तुलसी विवाह महासोहळ्याचा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण महाप्रसादाचा लाभ घेतला .
मंदिराचे पुजारी प्रसाद भंडारी यांनी पौरोहित्य केले. त्यांना पुजारी तुषार दीक्षित,
जयेंद्र वैद्य व गणेश जोशी यांनी सहकार्य केले.
यावेळी मंदिर व परिसराला अत्यंत मनोहारीरित्या पाने, फुले, केळीचे खांब, रांगोळ्या व रोषणाईने सजविण्यात आले होते. यशस्वीतेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस.एन.पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीष कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव,जयश्री साबे,डी.ए.सोनवणे, आनंद महाले सेवेकरी सुनीता कुलकर्णी, विनोद कदम,रविंद्र बोरसे,उमाकांत हिरे, शरद कुलकर्णी,गोरख चौधरी, खिलू ढाके, एम.जी.पाटील,जे.व्ही.
बाविस्कर, राहुल पाटील , आशिष चौधरी, सुबोध पाटील,विशाल शर्मा, आदींनी परिश्रम घेतले. डिगंबर महाले यांनी सूत्रसंचालन केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे