महाराष्ट्र

वैजापूर तहसिल कार्यालयासमोर चालू असलेल्या आंदोलकांनी शहीद जवानांना केले अभिवादन

वैजापूर (प्रतिनिधी) वैजापूरमध्ये शहीद दिनानिमित्त आज तहसील प्रांगणात शहीद भगतसिंग, शहीद शिवराम राजगुरू,शहीद सुखदेव थापर यांना शहरातील सर्व जातिधर्मातील नागरिकांनी एकत्र येऊन अभिवादन केले. प्रथम उपजिल्हाधिकारी माणिक आहेर नायब तहसीलदार कुलकर्णी, वैजापूरचे कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी पुष्प फुले वाहून शहीद जवानांना अभिवादन केले.

त्यावेळेस राजू पठाण व समाज कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, नगरसेवक उल्हास ठोंबरे, दीपक सिंह राजपूत यांनी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर अक्रम-खान, मोजमखान, शकील शेख, अवधुतानंद महाराज, दिगंबर गायकवाड, वैजीनाथ मिटकरी, अशोक धसे, सी,एम,चन्नेपाटील, निवृत्ती सोमासे, कांशीराम राजपूत, याशिवाय इतर सर्व नागरिकांनी शहीद दिनानिमित्त शहिदांना अभिवादन केले. कोविड लस  घेण्याचे आवाहन राजपूत यांनी केले. माणिक आहेर यांच्या हस्ते उपस्थितना मास्क वाटप करण्यात आले. राजेंद्रसिंह राजपूत, रियाजखान राजू पठाण व शेख, अवधुतानंद महाराज, दिगंबर गायकवाड, वैजीनाथ मिटकरी, अशोक धसे,सी,एम, चन्नेपाटील, निवृत्ती सोमासे, कांशीराम राजपूत याशिवाय इतर सर्व नागरिकांनी शहीद दिनानिमित्त शहिदांना अभिवादन केले.

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे