एस. टी. कर्मचाऱ्यानी राज्य शासनाचे बाराव्या दिवशी दशक्रियाविधि व मुंडण करत निषेध व्यक्त केला
चोपडा : विश्वास वाडे ,तालुका प्रतिनिधी
चोपडा : एस. टी. महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे यासाठी चोपडा आगाराचे कर्मचारी मागील बारा दिवसांपासून बेमुदत संपावर गेले आहेत. आज बारा दिवस उलटून देखील काही निर्णय घेत नसल्याने आज राज्य शासनाचे बारवा दशक्रियाविधि कार्यक्रम करून कर्मचाऱ्यांनी मुंडन करून आपला तिव्र निषेध व्यक्त केला.
एसटी महमंडळातील कर्मचाऱ्यांना कमी पगार व कामाचा अतिरिक्त ताण व अनियमित वेतानामुळे राज्यात ४० कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यामुळे राज्यातील सर्व कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे त्यामुळे राज्य सरकारने लवकरच निर्णय घेणे गरजचे असताना त्याच्याकडून मात्र आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळे चोपडा डेपोतील कर्मचाऱ्यांनी आज रोजी मुडण करत आपले आंदोलन तिव्र करत राज्य शासनाच्या विरोधात घोषणा देत जोरदार निषेध केला
यापूर्वी अनेक कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस बजावण्यात आली होती तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही धमकावण्याचा प्रयत्न करत आहे
तसेच असे सर्व कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस दिले तरी आम्ही घाबरणार नाही असा इशारा कर्मचाऱ्यानी दिला आहे यावेळी कर्मचाऱ्यानी राज्य शासनाच्या विरोधात घोषानाबाजी करत आम्ही कसे एक आहोत हे दाखवून दिले.