महाराष्ट्र

सेवाभावे प्रतिष्ठान तळोदातर्फे स्वर्गीय भारत सोनवणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पाणपोईचे उद्घाटन

बोरद (योगेश गोसावी) उन्हाची तीव्रता जाणवू लागल्या असून नागरिकांची पिण्याच्या पाण्याची तहान भागावी यासाठी विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर 131 वी जयंती व जैन धर्माचे तीर्थंकर, धर्मसंस्थापक भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त सेवाभावे प्रतिष्ठान, तळोदातर्फे स्वर्गीय भारत खुशाल सोनवणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तळोदा येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या समोर पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर,भारत माता व भगवान महावीर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी कृषीधन चे मालक शांताराम अण्णा पाटील, जैन समाजाचे ट्रस्टी, विश्व हिंदू परिषद शहर अध्यक्ष मुकेश जैन, गजानन ॲग्रो चे मालक श्री.सुभाष चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विश्व हिंदू परिषदचे जिल्हा मंत्री विजयराव सोनवणे, महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अंबालाल साठे, उमेश जैन, गौतम जैन, हर्षल जैन, प्रतीक जैन हे होते.

याप्रसंगी सेवाभावे प्रतिष्ठानाचे अध्यक्ष उमेश भैय्या सोनवणे म्हणाले की, जल ही जीवन आहे ग्रामीण भागातील बंधू माता बहिणीसाठी फिल्टर चे थंड पाण्याची व्यवस्था करणे हेच आमचे कर्तव्य आहे. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सेवाभावे प्रतिष्ठानाचे अध्यक्ष उमेश भैय्या सोनवणे, उपाध्यक्ष सागर पाटील, संचालक संतोष चौधरी, नकुल ठाकरे, अतुल पाटील, अनिल नाईक, आशिष मराठे, रोहन गुरव, विवेक चौधरी इत्यादींनी नियोजन केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे