महाराष्ट्रशेत-शिवार
महावितरण उपअभियंता कार्यालयाकडून शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचे काम ; शेतकऱ्यांचे शिरपूर पोलिसांना निवेदन !
शिरपूर (प्रतिनिधी) येथील महावितरण कंपनी उपअभियंता कार्यालयाकडून एका अस्वस्थ व निरपराध शेतकरी योगेश युवराज पवार यांच्या वर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर प्रकरणात शेतकरी योगेश पवार याने असे कोणतेही गैर कृत्य केले नसुन त्याने फक्त शेतकरी बांधवांच्या मागण्या प्रशासना प्रयत्न केला, सोबत शंभर शेतकरी होते. परंतु, फक्त एकाच शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला असून हा शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचे काम झाले आहे, असे आशायाचे निवेदन शिरपूर पोलिस ठाण्यात शेतकऱ्यांकडून देण्यात आले. यावेळी असंख्य शेतकरी बांधव निवेदन देताना उपस्थित होते.