जिल्हा परिषद सभेत सेस फंडा बाबत जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर आबा भामरे कडाडले.
मालपुर:दि.१९जुलै२०२२:(प्रतिनिधि): धुळे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा सुरू असताना बांधकाम विभागाला गेलेला सेस फंडाच्या २०२१ / २०२२ चा निधी कशा प्रकारे देण्यात आला तसेच २०२२ / २०२३ चा निधी कसा वापरणार आहात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अनियमित पणे घरकुलांचे वाटप केलेले आहे ज्या ग्रामपंचायत सदस्यांना घरकुल देण्यात आले आहे ते तात्काळ रद्द करण्यात यावे तसेच ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात यावे कारवाई न झाल्यास न्यायालयात दाद मागावी लागेल असा इशाराही जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर आबा भामरे यांनी जिल्हा परिषद च्या विशेष सर्वसाधारण सभेप्रसंगी दिला.
Lajjyoshri Films & Musics Presents
धम्माल अहिरानी सांग बघायला विसरु नका..
सोन्या आणि बबले ची सायकल स्वारी “चाल बबले डबल सीट”
या वेळी पुढे बोलताना म्हणाले की धुळे जि.प. च्या १५ वा वित्त आयोगाच्या निधी मध्ये आपल्याला केवळ ४ लाख रुपये निधी मिळाला आहे अध्यक्ष यांच्या गटाला २ कोटी उपाध्यक्षांना ७७ लाख लाखांचा निधी त्यांनी त्यांच्या गटामध्ये घेतलेला आहे आणी म्हणुन तालुक्यावर हा अन्यांय झाला आहे. अनियमित पणे प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत घरकुलांचे वाटप झाले आहे लाभार्थी ग्रामपंचायत सदस्यांचे पद रद्द करण्यांचे पत्र जिल्हा परिषद च्यां मुख्यकार्यकारी अधिकारी एस.भुवनेश्वरी तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे यांना दिले आहे याबाबत कारवाई न केल्यास उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल असा इशारा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर आबा भामरे यांनी दिला आहे.