मैदान उपलब्ध करून देण्याचे ग्रामपंचायतीचे आश्वासन
मैदानासाठी तरुणांचा ग्रामपंचायतीत ठिय्या
धुळे (स्वप्नील मराठे) सोनगीर तरुणांना पोलीस, सैन्यदलात भरतीसाठी सराव करण्यासाठी हक्काचे मैदान नसल्याने गैरसोय होत आहे. गेल्या अकरा वर्षांपासून येथील तरुणांना हक्काचे मैदान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासन हक्काचे मैदान मिळवून द्यावे यासाठी सर्व तरुणांनी ग्रामपंचायतींच्या मासिक |बैठकीवेळी घेराव घातला आणि आश्वासन नको हक्काची जागा निश्चित करुन ठराव द्यावा असा आग्रह धरत तरुणांनी कार्यालयात ठिय्या मांडला.
येथील अनेक सुशिक्षित युवक पोलिस, सैन्य दल, आदी विविध विभागांत जाण्यासाठी इच्छुक आहेत. त्यासाठी दररोज शारीरिक कसरत सराव करणे आवश्यक आहे. मात्र तरुणांसाठी हक्काचे क्रीडांगण नाही. त्यामुळे विविध अडचणींना तोंड द्यावे लागते.ग्रामपंचायतीची शनिवारी मासिक बैठक होती. ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करतांना तरुण यावेळी मैदान संघर्ष समितीच्या तरुणांनी हक्काचे मैदान मिळवण्यासाठी ठिय्या आंदोलन केले. यावेळी क्रीडाप्रेमी किशोर लोहार,सूरज परदेशी, शैलेश माळी, मोहन पाटील, काशीनाथ सूर्यवंशी, अक्षय चौधरी, निखिल माळी, मयूर महाजन, चंद्रकांत धनगर, सचिन धनगर, कन्हैया चौधरी, अफझल पिंजारी, चेतन माळी, चेतन पाटील, विशाल बैसाणे, ऋषीकेश माळी, गोपाल माळी, वैभव पाटील, वैभव लोहार, हर्षलगुरव, गौरव पावनकर, आकाश लोहार, आकाश जाधव, शिवम लोहार, गोविंदा धनगर, गोविंदा पाटील, नाना ठेलारी आदी उपस्थित होते. बैठकीत सरपंच रुखमाबाई ठाकरे, उपसरपंच विजूबाई बडगुजर, ग्रामविकास अधिकारी आर. एन. कुवर, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र जाधव, केदारेश्वर मोरे, आरीफ खाँ पठाण, शफोउद्दीन पठाण, समाधान पाटील, शाम माळी, मोहन सैंदाणे, इरफान कुरेशी, डॉ राहूल देशमुख, आदी उपस्थित होते. तीन जागांची पहाणी करणार गावातील तीन वेगवेगळ्या जागांची पाहणी क्रीडाप्रेमी व ग्रामपंचायत पदाधिकारी करणार आहे. लवकरच हक्काचे मैदान उपलब्ध करून देवू असे आश्वासन सरपंच रुखमा ठाकरे यांनी क्रीडाप्रेमी युवकांना यावेळी दिले.



