महाराष्ट्र
पाणी पुरवठा करणाऱ्या जलकुंभ गळतीमुळे नागरिकांच्या घरात पाणी
मालपुर (गोपाल कोळी) मालपुर मुख्यमंत्री ग्रामिण पेयजल योजनातर्फे जलकुंभ बांधण्यात आला. रहिवासी यांच्या घराजवळ पाईप लाईन गेली असुन सदर पाईप लाईन लिक झाली आहे. तरी शेजारच्य लोकांच्या घरात पाणी शिरत असुन तरी ग्रामपंचायत प्रशासन यांना सांगुन सुध्दा लक्ष देत नाही. राऊळ नगरमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरत असुन तरी लवकरात लवकर ग्रामपंचायत सरपंच / उपसरपंच व सदस्य यांना वारंवार सांगुन सुध्दा लक्ष देत नाही, तरी मालपुर ग्रामपंचायत यांनी लवकर हे मार्गी लावण्यात यावे हि राऊळ नगर ग्रामस्थांची मागणी आहे.



