जगद्गुरू संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी
सोयगाव (विवेक महाजन) महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय सेना भवन येथे जगद्गुरू संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकर (आबा) काळे यांच्याहस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जि.प.सदस्य गोपीचंद जाधव, नगराध्यक्षा आशाबी तडवी, उपनगराध्यक्षा सुरेखाताई प्रभाकर काळे, गटनेते अक्षय काळे, नगरसेवक संतोष बोडखे, हर्षल काळे, दिपक पगारे, संदीप सुरडकर, भगवान जोहरे, गजानन कुडके, अशोक खेडकर, लतीफ शहा, शेख शाहीस्ताबी, संध्याताई मापारी, कुसुम दुतोंडे, वर्षाताई घनघाव, ममताबाई इंगळे, शहा आशियाना, अमोल मापारी, भगवान वारंगणे, विक्रम चौधरी, राजू दुतोंडे, कदीर शहा, किशोर मापारी, समद शहा, बाबू चव्हाण, राहुल राठोड, यशवंत जाधव, विष्णू इंगळे, योगेश नागपुरे, दत्तू इंगळे, जीवन पाटील, भारत तायडे, दिनेश काळे, पंजाब कुणघर, विजय बिर्ला, संजय आगे, विकास काळे, नारायण घनघाव, शेख बबलू आदींची उपस्थिती होती.



