रोटरी क्लब ऑफ चोपडा व पं.स.चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखूमुक्त परिसर अभियानाचे पोस्टर व भित्तीपत्रके शाळांना वाटप
चोपडा प्रतिनिधी
राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखू मुक्त करण्यासाठी राज्य सरकारने राज्यात तंबाखू मुक्त शाळा अभियान राबविण्याच्या निर्णय घेतला आहे .या निर्णयानुसार राज्यातील सर्व शाळात या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे .राज्य सरकारकडून व्यसनमुक्तीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत याच अनुषंगाने रोटरी क्लब ऑफ चोपडा व पंचायत समिती चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने चोपडा शहरातील विविध शाळांमध्ये प्रत्यक्ष जाऊन मुख्याध्यापकांना तंबाखू मुक्त परिसर अभियानाचे पोस्टर व भित्तीपत्रकांचे वाटप करण्यात आले व सदर भित्तीपत्रके शाळेच्या दर्शनी भागात लावण्याचे आवाहन देखील करण्यात आले .
सदर भित्तीपत्रके शहरातील विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक विद्यालय ,महिला मंडळ प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, सद्गुरु कन्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालय ,प्रताप विद्यामंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय , श्रीमती अनुसयाबाई साळुंखे प्राथमिक विद्यालय, कस्तुरबा माध्यमिक विद्यालय, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यालय , अँग्लो उर्दू प्राथमिक व माध्यमिक विद्यालय इत्यादी शाळेत प्रत्यक्ष जाऊन रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष रोटे पंकज बोरोले , पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी डॉ.भावना भोसले तसेच एनक्लेव चेअर एम डब्ल्यू पाटील ,रोटरी क्लब ऑफ चोपडाचे सचिव प्रवीण मिस्त्री, खजिनदार भालचंद्र पवार ,प्रकल्प प्रमुख रोटे आरिफ शेख ,तंबाखूमुक्त शाळा अभियानाचे जळगाव जिल्ह्याचे ब्रँड ॲम्बेसिडर राजमोहम्मद शिकलकर , ग स सोसायटीचे संचालक देवेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत व शुभहस्ते तंबाखूमुक्त परिसर अभियानाचे पोस्टर व भितीपत्रके मुख्याध्यापकांना वाटप करण्यात आले.
शाळेच्या परिसरात धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणे गुन्हा आहे याव्यतिरिक्त इतर फलक शाळेच्या दर्शनी भागात लावावेत असेही आवाहन अभियानांतर्गत करण्यात आले आहे.
तंबाखू मुक्त परिसर अभियानाचे पोस्टर व भित्तीपत्रके वाटप प्रसंगी रोटे रुपेश पाटील, रोटे अरुण सपकाळे , रोटे पृथ्वीराज राजपूत, रोटे महेंद्र बोरसे , रोटे प्रदीप पाटील, रोटे विलास पी पाटील, डॉ. अमोल पाटील यांच्यासह रोटरी क्लब ऑफ चोपडाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.