साक्रीत भाजपातर्फे मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान
साक्री (सतीश पेंढारकर) साक्री मराठी पत्रकार दिनानिमित्त साक्री तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरातील पत्रकारांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ पत्रकार व कामगार चळवळीतील कार्यकर्ते बाबू दादा शाह यांच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्यास व स्मृतीस वंदन करण्यात आले.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब गीते तालुका अध्यक्ष वेडू अण्णा सोनवणे, एडवोकेट गजेंद्र भोसले, शहराध्यक्ष कल्याण भोसले, शैलेंद्र आजगे, राकेश अहिरराव, डॉक्टर देवेंद्र देवरे, पंकज हिरे, राकेश दहिते, योगेश चौधरी, योगेश भामरे, हेमंत पवार, अनिल पवार, बाबूलाल भावसार, दीपक वाघ, महेंद्र देसले, भाई भोसले व भाजपाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार बाबू दादा शाह, विजय भोसले, जी टी मोहिते, सतीश पेंढारकर, आबा सोनवणे, जगदीश शिंदे, शरद चव्हाण, संघपाल मोरे, भाई भोसले, जितेंद्र जगदाळे, प्रकाश वाघ, रवींद्र देवरे, ज्ञानेश्वर ढालवाले, शैलेश गादेकर या पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. कल्याण भोसले यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.