जिल्हा परिषद प्रशाला सोयगांव विद्यालयात १० वी च्या विद्यार्थ्यांना निरोप
सोयगाव (विवेक महाजन) जिल्हा परिषद प्रशाला सोयगांव येथील शाळेत १० वी च्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशाला सोयगांवचे मुख्याध्यापक आनंदा इंगळे हे होते. प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी रामकृष्णा लोहार, शालेय व्यवस्थापण समिती उपाध्यक्ष विष्णू मापारी, पत्रकार योगेश बोखारे हे उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
कोमल अस्वार,सुजाता अस्वार या दहावीच्या ग्रुपने स्वागतगीतातुन मान्यवरांचे स्वागत केले.मान्यवरांचा प्रशालेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंकज रगडे यांनी केले. दहावीच्या मुलामुलींनी शाळेला महान व्यक्तिंच्या प्रतिमा, घड्याळ, डस्टबिन तसेच वृक्षारोपणासाठी रोपटे भेट दिले. दहावीची विद्यार्थीनी प्रतिनिधी म्हणुन अमृता रोठे हीने आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रमुख पाहुणे रामकृष्णा लोहार व विप्णू मापारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अशोक पवार,रमेश कोळी यांनी आपले विचार मांडले. आंनदा इंगळे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या वमार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैष्ववी काळे या विद्यार्थींनीने केले तर आभार पुनम ताडे हिने मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक पवार, दौलतसिंग परदेशी, विद्याधर बागुल, अनिल ठाकुर, पंकज रगडे, संजीव जोशी, रामटेके, येवले, रमेश कोळी, वैजनाथ सावळे तसेच शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.