महाराष्ट्र

औरंगाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची प्रमुख पदाधिकाऱ्यांची पक्ष विस्तारित आढावा बैठक संपन्न

सोयगाव (विवेक महाजन) औरंगाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची प्रमुख पदाधीकाऱ्यांची पक्ष विस्तारित आढावा बैठक राष्ट्रवादी भवन येथे संपन्न झाली.

या बैठकीस मार्गदर्शक मराठवाडा संपर्क प्रमुख जयसिंगराव गायकवाड बैठकीचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली व सोयगाव तालुका अध्यक्षा अनुराधा सुधीर पठाडे यांनी राष्ट्रवादी पक्षाचे मराठवाडा संपर्क प्रमुख जयसिंगराव गायकवाड यांच्याशी आढावा बैठक संपल्यानंतर सोयगाव शहराची व तालुक्याची व्यथा मांडली व निवेदन देऊन सोयगाव तालुक्यातील कामे कागदपत्रे कामे दाखऊन आर्ध्याच्या वर बिल लाटले जातात व त्या कामांवर कितीतरी महिने दगड धोंडे पडलेले राहतात. त्या दगड धोंड्यांमुळे अपघाताची शक्यता राहते व चांगल्या कामाचे स्वरूप दिसून येत नाही व निकृष्ट दर्जाचे कामे दिसून येतात. शहरामध्ये सांडपाण्यामुळे साथीचे रोग येतात त्याकडे दुर्लक्ष करतात. मग आम्ही कोणाला सांगावे त्यांनी उपाय योजना करावी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना सांगून सोयगाव तालुका विकासासाठी सोयगाव नगरपंचायत व सोयगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निधी उपलब्ध करुन विकास कामाला गती आणावी अशी मागणी केली व सामान्य जनतेकडे कामाचे स्वरूप घेऊन आले असता त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. अश्या विविध मागण्या व तक्रारी शासन दरबारी मांडण्यात याव्या असे मराठवाडा संपर्क प्रमुख जयसिंगराव गायकवाड (काका) यांच्या कडे निवेदनाच्या स्वरूपात सोयगाव तालुका व सोयगाव शहराची समस्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुका अध्यक्षा अनुराधा पठाडे यांनी मांडली आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे