महाराष्ट्र

फैजपूर यावल रस्त्यावर सांगवी जवळील पेट्रोल पंप जवळ दोन दुचाकींची धडक

यावल (प्रतिनिधी) फैजपूर रस्त्यावर सांगवी पेट्रोल पंप जवळ गुरूवारी दुपारी दोन वाजेला दुचाकी क्रमांक एम. एच. 15 बी. बी. 88 33 द्वारे छोटू एकलोसिंग बारेला (वय 32 रा. रावेर) हा यावल कडून फैजपूर कडे जात होता. तर दुचाकी क्रमांक एम. एच. 39 एक्स. 0576 द्वारे अब्दुल हफिस अब्दुल हमीद (वय 45 रा.मन्यार गली चोपडा) हे फैजपूर कडून यावल कडे येत होते. दरम्यान दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली या दोघे गंभीर जखमी झाले.

घटनास्थळावरून मार्गस्थ होणार साकळी येथील मेश इंडस्ट्रीचे मालक युनूस मन्सुरी व त्याचे मित्र मंडळींनी तातडीने दोघा गंभीर जखमींना उपचाराकरिता यावल ग्रामिण रूग्णालयात दाखल केले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.बी. बारेला, अधिपरीचारिका दिपाली किरंगे, शुभम पाटील, अमोल अडकमोल, सोनाली देशमुख, मानसी उंबरकर, मुराद तडवी, निरज झोपे, बापू महाजन, दुर्गेश पाटील, फारूक तडवी, प्रविण बारी आदींनी प्रथमोपचार केले. यातील अब्दुल हाफिज यांची प्रकृती जास्तच गंभीर असल्याने त्यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच फैजपुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या सूचनेवरून घटनास्थळावर हवालदार देविदास सुरदास, राजेश बऱ्हाटे, पोलीस नाईक महेंद्र महाजन यांनी भेट दिली दोघं वाहने त्यांनी ताब्यात घेतले असून घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील कारवाई पोलिस करीत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे