भडगाव तालुक्यात रब्बी पाठोपाठ खरिप हंगामाच्या अनुदानातही घोळ
गोंडगाव ता. भडगाव (सतीश पाटील) भडगाव तालुक्यातील गोंडगाव खरीप अनुदानात मोठ्या प्रमाणात घोळ झाला असून अनेक शेतकऱ्यांची नावे वगळली गेली होती तर काही शेतकऱ्यांना अद्यापही पैसे आले. मात्र, त्या ठिकाणी घोळ केला तो कृषी अधिकाऱ्यांनी असे वरिष्ठांचे म्हणणे आहे आहे.
दरम्यान, त्यांनी पूर्ण पंचनामा केला नसल्याकारणाने काही शेतकऱ्यांना वंचित रहावे लागले. मात्र, खरीप हंगामाच्या अतिवृष्टीचे पैसे देतील. त्याच घोळमध्ये अडकले असून त्याठिकाणी पंचनामा तर अडथळा येत नसणार अशी शंका शेतकऱ्यांना व्यक्त होत आहे. आत्तासुद्धा शेतकऱ्यांना हेक्टरी 10000 ऐवजी कमी रक्कम मिळत आहे. या संदर्भात शेतकर्यांना त्वरित हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान मिळवायची पाहिजे, अशी मागणी शेतकरी संघटनेतर्फे होत असून इथे काही दिवसात न्याय न मिळाल्यास शेतकरी संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी सेना तालुका अध्यक्ष सतीश पाटील यांनी दिला आहे.