मुक्तळ येथील तरुणांच्या हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्या : रा.ना.सोनवणे
जामठी (प्रतिनिधी) बोदवड तालुक्यातील मुक्तळ येथील ग्रा.प.सदस्य शिवाजी गोकुळ पारधी (वय २८) यांची शनिवार रोजी बेदम मारहाण करून हत्या केल्याची घटना घडल्याने पारधी समाजावर हा अन्याय झाल्या प्रकरणी दि.८ रोजी बोदवड येथील शासकिय विश्रामगृह येथील आदिवासी पारधी महासंघाचे महासचिव रा.ना.सोनवणे यांनी पत्रकार परिषद आयोजित करून मुक्तळ येथील मयत शिवाजी पारधी राजकिय असुयापोटी अनैतिक संबंध दाखवुन शिवाजी यास महिलेने घरात रात्री च्या वेळेस बोलवून अपहरण करून घरातील सर्व सदस्यांनी बेदम मारहाण करून शिवाजी पारधी यांची हत्या केली. व पुरावे नष्ट व्हावे यासाठी मृतदेह हे बोदवड – मलकापूर एका पुलाखाली फेकून देण्यात आले.
त्यानंतर हा गुन्हा करण्यास पोलीसांनी टाळाटाळ केली व केवळ ९ आरोपी वरचं गुन्हा दाखल केला व मोजकेच आरोपी अटकेत आहे. मात्र या प्रकरणी काही आरोपी मात्र अद्यापही गुन्हा करून देखील मोकाटच आहे. तरी सर्व आरोपींचा पोलीस प्रशासनानी निपक्षपातीपणाने शोध घेऊन आरोपींना कठोर अशी कारवाई करावी. तथा सर्व आरोपींच्या विरोधात आॅट्रोसीटी चा गुन्हा नोंद करावा तथा पोलीस प्रशासनाच्या वतीने आरोपीच्या घराला संरक्षण आहे. मात्र पारधी वस्तींना का ? संरक्षण नाही. तथा या गुन्हिवरील पोलीस निरीक्षकाकडील तपास काढून इतर अधिकाऱ्यांकडून निपक्षपाती पध्दतीने तपास करावा ही मागणी महासचिव रा.ना. सोनवणे यांच्याकडून करण्यात आली.
दरम्यान याप्रकरणी आरोपींवर कठोर करावाई करावी अशी मागणी केली. यानंतर आदिवासी पारधी महासंघाच्या वतीने बोदवड चे तहसीलदार योगेश्वर टोंम्पे व बोदवडचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी स संघटनेचे प्रल्हाद सोनवणे, विष्णू सोनवणे, तालुका अध्यक्ष समाधान पारधी, राज्य सचिव जितेंद्र पारधी, जिल्हा उपाध्यक्ष अरूण पारधी, ज्ञनेश्वर पारधी, मधुकर पारधी, सुरेश पारधी, नितीन पारधी, जयसिंग पारधी, आशाबाई पारधी, सोनाबाई पारधी, शारदाबाई पारधी, मंगलाबाई पारधी, कल्पना पारधी, रूख्माबाई पारधी, रंजनाबाई पारधीसह मरत शिवाजी पारधी यांच्या घरातील सर्व सदस्य या पत्रकार परिषदेत उपस्थित होते.