सनपुले गावात वहिवाटप्रमाणे रस्ता वापरास मिळावा ; गावकऱ्यांची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी
चोपडा (प्रतिनिधी) मुख्य-कार्यकारी डाँ पंकज आशिया जिल्हा परिषद जळगाव यांना शेतकरी संघर्ष संघटनेचे तालुका अध्यक्ष समाधान बाविस्कर व ग्रामपंचायत सदस्य रतीलाल बाविस्कर व तसेच दलीत सर्व समाज बांधव व महिला यांनी आज लेखी निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सनपुले गावात दलित वस्तीत वडिलोपर्जीत रस्ता असुन ट्रिमिक्स चे काम चालु असताना मध्ये काम बंद करण्यात आले होते सदर हुन हा रस्ता सार्वजनिक स्वच्छालयावरून पाणी आणण्या साठी वापरण्यात येत होता व स्मशानभुमी जाण्यासाठी हा रस्ता वापरण्यात येत होता. काही दिवसाने ग्रामपंचायत मालकिचा रस्ता हा वापरण्यात दिला होता, तोच रस्ता पुढे काही लोकांनी हा रस्ता नाही म्हणून काम बंद केले होते. कैलास मुरलीधर पाटील यांची प्लाँट असल्या मुळे त्यांनी पुढील रस्ता बनवण्यात येऊ नये म्हणून काम बंद करण्यात आले आहे सदर ज्या प्लाँट धारकाने जुने मुळ मालकाने प्लाँट विक्री केलेला होता त्यांना मुळ रस्ता माहीत आहे त्यांनी तसे सांगितले असताना नव्या प्लाँट मालकाने हि बाब मान्य केलेली नाही सदर प्लाँटचा अर्धा हिस्सा आलेला प्लाँट मालक रतीलाल संतोष बाविस्कर व उत्तम दौलत बाविस्कर हे रस्ता द्यायला तयार असुन उर्वरीत प्लाँटधारक पुढील रस्ता देण्यास तयार नसुन आडमुठ्ठे पणा करीत आहेत. सरंपंच व तसेच ग्रामसेवक यांना घटना स्थळी बोलाऊन दलित वस्तीचे काम पुर्ण करण्याची विनंती केली तरी काही तोडगा निघाला नसल्यामुळे सरंपच व तसेच ग्रामसेवक यांना ही एक लेखी अर्ज दिला आहे तरी आपण पण या कामाची दखल घ्यावी .व आम्हा दलित बांधवाना न्याय मिळुन घ्यावा अश्या आशयाचे निवेदन आज जळगावात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांना देण्यात आले.
जर आपण न्याय मिळवुन नाही दिला तर शेतकरी संघर्ष संघटनेचे स्वस्थापंक अध्यक्ष हंसराज वडघुले पाटील व कार्यअध्यक्ष नाना बच्छाव तसेच गावातील दलित बांधव हे लोकशाही मध्ये असलेल्या अधिकाराचा वापर करुन अन्यायाविरुध्द आमरण उपोषणास बसतील. आणि होणार्या परिणामास सनपुले ग्रामपंचायत कारणीभुत असेल असे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांना देण्यात आले आहे.
निवेदन देताना मालुबाई युवराज बाविस्कर, आशाबाई शांतीलाल बाविस्कर, वैशाली कैलास बाविस्कर, विजय बाविस्कर, उत्तम बाविस्कर, वासुदेव बाविस्कर, आंनदा बाविस्कर, दगडु बाविस्कर व ग्रामपंचायत सदस्य रतीलाल बाविस्कर, शेतकरी संघर्ष संघटनेचे चोपडा तालुका अध्यक्ष समाधान बाविस्कर उपस्थित होते.