भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराने दिली छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना
शिवजयंती उत्साहात साजरी
भुसावळ (प्रतिनिधी) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी तर्फे मानवंदना देण्यात आली. यावेळेस भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास हार घालून त्यांना वंदन केले. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून त्यांच्या जय घोषाच्या उस्फुर्त घोषणा दिल्या.
छत्रपती शिवाजी महाराज यांना यांना जयंतीनिमित्त मानवंदना देण्यासाठी भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर अध्यक्ष परिक्षित बऱ्हाटे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, राजेंद्र नाटकर, जिल्हा चिटणीस शैलेजाताई पाटील, शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, नगरसेवक प्रा.दिनेश राठी, गिरीश महाजन, सतीश सपकाळे, निक्की बत्रा, राजेंद्र आवटे, नारायण रणधीर, लक्ष्मण सोयंके,राजु खरारे,पवन बुंदेले, मुकुंदा निमसे,खुषाल जोशी, रामदास सावकारे, धनराज बाविस्कर,जयंत माहुरकर, प्रविण इखनकर, कैलास शेलोडे, प्रा.विलास अवचार,किरण मिस्त्री, जयंत जंगले,अनिल पाटील, दिनेश दुधानी, युवा मोर्चा सरचिटणीस श्रेयस इंगळे, मंगेश पाटील, चेतन बोरोले, चेतन सावकारे, गोपीसिंह राजपूत,लोकेश जोशी,विजय डोंगरे, विवेक राजपूत, कश्यप भावसार, यश बढे, उज्वल चौधरी आदींची उपस्थिती होती.