पिंपळगाव बसवंत येथे माहित अधीकार महासंघाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न
पिंपळगांव बसवंत (मनोज साठे) आपल्या देशात जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे,ही अभिमानस्पद बाब आहे. पण आपली लोकशाही ही जगात सर्वांत चांगली लोकशाही नाही,ही खंत आहे. सरकारी भ्रष्टाचार,राजकीय असाक्षरता आणि सामान्य लोकांना अधिकार व कर्तव्याची नसलेली जाणीव हे भारतीय लोकशाही समोरील तीन मोठे शत्रू आहेत. माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, ग्राहकांचे हक्क व मानव अधिकार या सारखे कायदे सामान्य जनतेने मोठ्या प्रमाणात वापरायला सुरवात केली तर सरकारी पातळीवरी भ्रष्टाचार संपून जाईन.असा आशावाद माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी व्यक्त केला. ते पिंपळगांव बसंवत येथे दिनांक एक मार्च २०२२ रोजी संतोषी माता मंदिर परिसरात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
कार्यक्रमाचे आयोजन अभिजीत चव्हाण (अ. मुख्य संघटक निफाड तालुका), हेमंत केदार (अ. मुख्य संघटक चांदवड तालुका) यांनी केलं तर प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष बस्वेकर (अ. महासंघ संस्थापक महाराष्ट्र राज्य), संतोष विधाते (अ. कार्याध्यक्ष दिंडोर तालुका), अल्पेश पारेख (भाजपा प्रदेश सचिव अल्पसंख्याक मोर्चा) उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी बापूसाहेब पाटील (भाजप प्रदेश सरचिटणीस किसान मोर्चा) उपस्थित मान्यवर राजाराम ओतर (संघटक दिंडोरी तालुका), गोरख जाधव (सहप्रचार प्रमुख दिंडोरी तालुका), रमाकांत विधाते (उपप्रचार प्रमुख दिंडोरी तालुका), बशीर शेख (मुख्य संघटक निफाड तालुका), वसंत भोसले (सहप्रचार प्रमुख निफाड तालुका), कचरू मोरे (उपप्रचर प्रमुख निफाड तालुका), दत्तू जाधव (संतोषी माता मंदीर संस्थापक पिंपळगाव बसवंत) आदी उपस्थित होते.