योगेश कोल्हेच्या प्रयत्नाने हरविलेल्या महिलेला मिळाला परिवार !
भुसावळ : शहरातील बद्री प्लॉटमध्ये एक वयोवृद्ध महिला योगेश नारायण कोल्हे यांच्या घराजवळ येऊन अचानक उन्हाच्या तापमानामुळे जमिनीवर पडली. हे दृश्य योगेश कोल्हे यांच्या पत्नीने पाहताच त्यांनी महिलेकडे जाऊन महिलेला उचलून अपार्टमेंट मध्ये सावलीत बसविले. पाणी पाजले यानंतर महिलेला विचारपूस केली असता महिला माहिती देऊ शकली नाही. पण महिलेच्या साडीच्या पदरामध्ये पत्ता लिहिलेली एक चिट्ठी बांधलेला मिळून आली. त्या आधारे योगेश कोल्हेनी प्रयत्न करून हरविलेल्या महिलेच्या परिवाराचा शोध लावला.
गेल्या दोन दिवसांपासून अनारा हिंद्रेमन यादव वय ७६ ह्या महिलेचा शोध त्यांचा मुलगा राज बहादूर यादव व नात सरोजा फुलचंद यादव दोघे राहणार संताक्रुज,कृष्ण सोसायटी साने गुरुजी स्कुल जवळ मुंबई हे घेत होते. भुसावळ शहरात बद्री प्लॉटमध्ये दुपारी ०२.३० वाजेच्या सुमारास वयोवृद्ध महिला अनारा हिंद्रेमन यादव ही योगेश नारायण कोल्हे यांच्या घराजवळ येऊन अचानक उन्हाच्या तापमानामुळे जमिनीवर पडली.याकडे रेखा योगेश कोल्हे यांचे लक्ष गेले असता त्यांनी महिलेच्या दिशेने धाव घेऊन महिलेस उचलून आपरमेन्ट मध्ये सावलीत बसविले.पाणी पाजले तसेच जेवणही दिले.महिलेला कुठे राहते याबाबत विचारपूस केली असता महिलेची प्रकृती खालावल्याने बोलू शकली नाही.पण महिलेच्या साडीच्या पदराला बांधलेली एक गाठोडी दिसली ती उघडून पाहिली असता त्यामध्ये महिलेचा पत्ता लिहिलेला मिळून आला.याबाबत योगेश नारायण कोल्हे यांनी मुंबईला उपचारासाठी गेलेले नगरसेवक निर्मल कोठारी (पिंटू) यांना सर्व माहिती सांगितली असता रात्र होत असल्याने महिलेला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाण्यास सांगितले व पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांची भेट घेऊन त्यांच्या सोबत फोन वरून निर्मल कोठारी यांचे बोलणे करून देण्यास सांगितले.
सदर महिलेची नात व मुलगा मुंबई वरून पोलीस स्टेशनला आले असता त्यांची विचारपूस करता त्यांची ओळ्ख पटल्याने सदर महिला नामे अनारा हिंद्रेमन यादव हिस सुखरूप त्यांचे नातेवाईकांकडे बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल गायकवाड यांचे ताब्यात देऊन रवाना केले आहे.महिलेच्या गळ्यात ५ ते ६ ग्रॅमचे सोन्याचे पेंडल, कानातील ५ ते ६ ग्रॅमचे सोन्याचे टॉप्स व साडीच्या पदरात पाकीट त्यात ३२०० रुपये असे मुद्देमाल योगेश कोल्हे यांनी महिलेला पोलीस स्टेशन जमा केले. त्यावेळी महिलेजवळ होता अशी माहिती योगेश कोल्हे यांनी दिली.