भुसावळ शहर पोलिसांचा तावडीतून फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखा (जळगाव) च्या जाळ्यात
भुसावळ (अखिलेशकुमार धिमान) भुसावळ शहर पोलिसात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी राजू विक्रम कांडेलकर याला दि.३० मार्च रोजी पोलीस कर्मचारी धुळे कारागृहात घेऊन जात होते. जैन पाईपजवळ पोलीस वाहनातून उडी घेत त्याने धूम ठोकली होती. दरम्यान, एलसीबीच्या पथकाने त्याचा शोध घेत त्याला पुन्हा जेरबंद केले आहे.
दि.३० मार्च रोजी भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार हे भुसावळ शहर पो.स्टे गुरनं. ४१/२०२२ भादंवि क.३७९ या गुन्ह्यातील आरोपी राजु विक्रम कांडेलकर वय २० रा. महालखेडा ता. मुक्ताईनगर यास धुळे सबजेल येथून ताब्यात घेवून धुळे ते भुसावळ असे शासकिय वाहनातून आणत असतांना तो जैन पाईप फॅक्टरी पाळधी येथे वाहन हळू झाल्याने त्यादरम्यान आरोपीने शासकिय वाहनाचा मागचा दरवाजा उघडून उडी मारुन पळून गेला होता. त्याबाबत धरणगाव पो.स्टे. ला गु.र.नं. ९३/२०२२ भादंवि क.२२४ प्रमाणे दि.३०/०३/२०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक, जळगाव, डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक जळगाव, चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक, (प्र.)जळगाव रमेश चोपडे, यांनी पो.निरी. स्था.गु.शा.जळगाव किरणकुमार बकाले, यांना सदर बाबत योग्य ते मार्गदर्शन करुन सदर आरोपी पकडणे बाबत सूचना दिल्या होत्या.
पोलीसांच्या हातून पळून गेलेला आरोपी हा तांदलवाडी ता. रावेर येथे असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने पो. नि. किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सफौ.वसंत ताराचंद लिंगायत, पोहेकाॅ.दिपक शांताराम पाटील, पोना किरण मोहन धनगर, पोना प्रमोद अरुण लाडवंजारी, चा.पोना अशोक युवराज पाटील अशांचे पथक तयार करुन त्यांना तात्काळ रवाना केले. नमुद पथकातील पोलीस अंमलदार यांनी तांदलवाडी ता.रावेर येथे जावून आरोपी राजू विक्रम कांडलकर याचा शोध घेतला असता तो त्याचा भाऊ राहुल विक्रम कांडेलकर यांचे घरी असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी सापळा रचून राजु विक्रम कांडेलकर वय २० रा. महालखेडा ता. मुक्ताईनगर यास शिताफिने ताब्यात घेवून धरणगाव पो.स्ट. गु.र. नं. ९३/२०२२ भादंवि क. २२४ या गुन्हयांत पुढील तपास कामी ताब्यात देण्यात आले आहे.