सप्ताहाच्या माध्यमातून मिळालेल्या शिकवणीचे प्रत्येकाने आचरण केले पाहिजे : अब्दुल सत्तार
सिल्लोड (विवेक महाजन) अखंड हरिणाम सप्ताह म्हणजे सकारात्मक ऊर्जेचे स्रोत असून या माध्यमातून सुखी जीवनाचा मार्ग व सामाजिक बांधिलकीचा संदेश मिळतो. सप्ताहाच्या माध्यमातून मिळालेल्या शिकवणीचे प्रत्येकाने आचरण केले पाहिजे असे मत महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिंदेफळ ता. सिल्लोड येथे व्यक्त केले.
शिंदेंफळ येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह तसेच श्रीमद भागवत कथा सोहळ्यास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी (दि.5) भेट दिली. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित भाविक भक्तांशी संवाद साधत असतांना बोलत होते. यावेळी त्यांनी उपस्थितीत भाविक भक्तांना अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर ह.भ.प. रवींद्र महाराज राजहंस यांचा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, प.स.सभापती डॉ.संजय जामकर, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शेख सलीम हुसेन, राजू गौर, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, मारुती पा. वराडे, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार, नगरसेविका शकुंतलाबाई बन्सोड यांच्यासह गावातील रानुबा शिंदे, नारायण करडेल, नामदेव शिंदे, पांडुरंग सपकाळ, रामसेट बकले, नवनाथ अक्कलकर, नंदू शिंदे, गोरख अक्कलकर आदींसह परिसरातील भविकभक्तांची उपस्थिती होती.