बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ
जळगाव (प्रतिनिधी) हिंदुरुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ लोकमान्य टाऊन हॉल येथे नुकताच पार पडला.
प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा प्रमुख शिवसेना विष्णू भाऊ भंगाळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष आप्पासो कारभारी आहेर, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख मनिषाताई परब, माजी उपजिल्हाप्रमुख नरेंद्र सिंग ठाकोर, माजी उपजिल्हाप्रमुख देवेंद्र देशमुख, शहर प्रमुख संजय पाटील, माजी उप नगराध्यक्ष कल्याण पाटील, माजी तालुकाप्रमुख किसन पाटील, नगरसेवक प्रताप शिंपी, माजी शहर प्रमुख नितीन निळे, खाशी उपाध्यक्ष कमल (भाऊ) कोचर, ज्ञानेश्वर पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख श्रीकांत पाटील, उपतालुका प्रमुख शिवकुमार पाटील, उपतालुकाप्रमुख संजय पवार, सरपंच संघटना अध्यक्ष सुरेश पाटील, विभाग प्रमुख बोरसे टेलर, उमेश अंधारे, युवती सेनाप्रमुख जया बैसाने, युवा सेना शहर प्रमुख अमर पाटील, व्यापारी सेना विमल बाफना, साखरलाल महाजन, उपशहर प्रमुख जीवन पवार, समन्वयक वैद्यकीय सेना प्रमोद शिंपी, अनंत निकम, रामचंद्र परब, बाळासाहेब पाटील खर्दे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर संघटक चंद्रशेखर भावसार यांनी केले कार्यक्रमास विद्यार्थी व पालक यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिली. कार्यक्रमाचे आयोजक उपशहर प्रमुख मोहन भोई, माजी तालुका संघटक बाळासाहेब पवार यांनी केले होते.