शिंदखेडा तालुक्यातील सहा गावासह एकुण बारा गावांना होणार लाभ !
राष्ट्रवादीचे नेते संदीप बेडसे यांची आणखी एक मोठी कामगिरी
शिंदखेडा (यादवराव सावंत) उपसा सिंचन योजनेसाठी पाठपुरावा करून 115 कोटी रुपये आणल्या नंतर राष्ट्रवादीचे नेते संदीप बेडसे यांनी शिंदखेडा तालुक्यातील जनतेला आणखी एक सुखद धक्का दिला आहे. नदी जोड प्रकल्प अंतर्गत पुन्हा 14 कोटी 70 लाख रुपये मंजूर करून आणले आहे. यामुळे आता बलदाणे धरणाचे पाणी शेताच्या बांधापर्यंत पोहचत तब्बल 838 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.
धुळे व नंदुरबार जिल्ह्यांच्या सरहद्दीवर आणि शिदखेडा तालुक्याच्या टोकाला बलदाने हे मातीचे धरण आहे. सन 2011 मधे या कामासाठी एक कोटी 42 लाखाच्या खर्चास नंदुरबार जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली. मात्र त्यानंतर या कामाकडे फारसे कोणी लक्षच दिले नाही. परिणामी विषय मागे पडून शेतकरी पाण्यावाचून वंचित राहिलेत. ही बाब राष्ट्रवादीचे नेते संदीप बेडसे यांच्या निदर्शनात आली . त्यांनी राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कडे सातत्याने पाठपुरावा केला. मंत्रीमहोद्यानी दोन्ही जिल्ह्याचे कलेक्टर आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विषयाचे गांभीर्य विचारात घेता सुधारित मंजुरीसह तब्बल 14 कोटी 70 लाखाच्या सुप्रमास हिरवा कंदील दिला. यापैकी 13 कोटी 97 लाखाचा निधी नंदुरबार जिल्हाधिकारीकडे वर्ग ही झाला आहे या बाबतचा शासन आदेश स्वतः मंत्री जयंत पाटील आणि बेडसे याना दिला.
या गावांना होणार फायदा
नदी जोड प्रकल्पाअंर्तगत मजूर झालेल्या या कामात अमरावती प्रकल्पातून साडे सात किलोमीटर पाणी उचलून संडाव्याद्वारे शेतांपर्यंत फिरविले जातील. अमरावती प्रकल्पावर आधीपासून 617 दलघमी पाणी साठा आरक्षित आहे. यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील बलदाने, खोकराळे, भादवड, बह्याने, सातूरके, आणि मांजरे या गावांना लाभ होईल. तर शिंदखेडा तालुख्यातील मालपूर, रामी, पथारे, धावडे, झिरवे, निमगुळ या गावांना प्रत्यक्ष फायदा होऊन परिसर सुजलाम सुफलाम होणार आहे.
..त्यांनी फक्त राजकारण केले- संदीप बेडसे
बल्हाने धरणाच्या माध्यमातून शेतीला पाणी मिळावे, ही शेतकऱ्याची जुनीच मागणी आहे. मात्र स्वतःला या तालुक्याचे भाग्यविधाते म्हणवून पाठ थोपटून घेणाऱ्यानी या विषयावर आजपर्यंत केवळ राजकारणच केले.आता मात्र प्रत्यक्ष पाणी मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया संदीप बेडसे यांनी दिली.