धुळे जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी गणेश गर्दे विजयी
धुळे (करण ठाकरे) महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अंतर्गत झालेल्या धुळे जिल्हा युवक काँग्रेसच्या निवडणूकित जिल्हाध्यक्षपदी गणेश मधुकर गर्दे हे विजयी झाले असून लोकशाही पध्दतीने झालेल्या निवडणूकित त्यांना एकूण १० हजार ६६ मते मिळाली आहेत. दरम्यान गणेश गर्दे यांनी दोन वर्ष युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे.
देशाचे युवा नेते राहुल गांधी यांच्या संकल्पनेनुसार युवकांच्या संघटनासाठी लोकशाही पध्दतीने युवक काँग्रेसची पक्षांतर्गत निवडणूक घेण्यात आली. दि. १२ नोव्हें. ते १२ डिसेंबर ा T – 7 त २०२१ या कालावधीत वुईथ इंडीयन युथ केले आहे. ब काँग्रेस या मोबाईल अॅपव्दारे प्रत्यक्षरित्या ऑनलाईन मतदान घेण्यात आले होते. लोकशाही पध्दतीने घेतलेल्या मतदान प्रक्रीयेत जिल्हयातील युवकांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले होते. युवक काँग्रेसची डिजीटल सदस्य नोंदणीसोबतच ऑनलाईन निवडणूकीसाठी मतदान संपन्न झाले होते. या निवडणूकिचा आज दि. ७ मार्च रोजी निकाल घोषीत करण्यात आला त्यात धुळे जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी गणेश मधुकर गर्दे (सडगाव ता. धुळे ) हे विजयी झाले असून त्यांना एकूण १० हजार ६६ मते मिळाली आहेत. तर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी पंकजचव्हाण (नावरा ता. धुळे), राहूल माणिक (दोंडाईचा) हे विजयी झाले आहेत. दरम्यान धुळे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून गेंद्या पावरा (शिरपूर ) आणि धनलाल पवार (साक्री) यांची निवड झाली आहे. तर धुळे जिल्हा युवक काँग्रेसच्या सचिवपदी कुलदिप निकम (शिंदखेडा) हे विजयी झाले आहेत. जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे ह्यांनी गेल्या दोन वर्षापासून आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे कामकाज सांभाळले आहे.
कमी कालावधीत जिल्ह्यातील युवकांचे संघटन करुन युवक काँग्रेस तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम
दरम्यान गेल्या दोन वर्षापासून कोरोना काळात पक्ष संघटनेबरोबरच आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबीरासह कोरोना साथरोग प्रतिबंधक उपक्रम घेत उल्लेखनिय काम केले आहे. धुळे जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी विजयी झाल्याबद्दल गणेश गर्दे यांचे माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील, महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील, महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव युवराज करनकाळ, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, धुळे जिल्हा शहर काँग्रेस अध्यक्ष माजी आ. प्रा. शरद पाटील यांनी अभिनंदन केले आहे.