पिके करपू लागल्याने पाणी विज कनेक्शन खंडीत करू नये ; आ. कुणाल पाटील यांची अधिवेशनात मागणी
धुळे (करण ठाकरे) कोणतीही पूर्वसूचना न देता थकीत विजबिल भरले नाही म्हणून शेतकर्यांच्या कृषीपंपांचा विज पुरवठा खंडीत केला जात आहे, परिणामी बळीराजाच्या डोळ्यासमोर रब्बीतील उभी पिके पाण्याअभावी करपली जात आहेत, तेव्हा शेतकर्यांना आपल्या डोळ्यातील अश्रू अनावर होत आहेत. त्यामुळे शेतकर्यांच्या अश्रू पुसण्यासाठी सरकारने तत्काळ कृषीपंपांची वीज तोडणी थांबविण्याची मागणी धुळे ग्रामीणचे आ. कुणाल पाटील यांनी आज अधिवेशनात केली.
अधिवेशनाच्या दुसर्या आठवड्यात शेतकर्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर बोलतांना आ. कुणाल पाटील यांनी सांगितले कि, धुळे जिल्हयासह राज्यातील शेतकरी दुर्दैव आहे. रडकुंडीला आला आहे. आज रब्बीचे पिक जे डोळ्यासमोर दिसत आहे, परंतु उर्जा विभागाकडून कृषीपंपाचा विज पुरवठा खंडीत केलात जात असल्याने रब्बीचे हे पिक हातातून जातो कि काय ? अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. येणार्या काळात महाराष्ट्रात कृषीपंपाची विजबिल भरायला पैसे नाही आणि हातातोडांशी आलेले पिक करपून गेले त्यामुळे शेतकर्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारू शकत नाही. खरीपाच्या हंगामात सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्राने अतिवृष्टी अनुभवली. त्यामुळेप्रत्येक शेतकर्याला प्रचंड नुकसानीला तोंड द्यावे लागले परिणामी शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला. कसाबसा त्यातून शेतकरी सावरत रब्बीच्या आशेवर उभा राहिला तेव्हा आपले उर्जा विभागातील विज वितरण कंपनीचे अधिकारी कृषी पंपाचे विज कनेक्शन खंडीत करीत आहेत तेव्हा विहीतील डोळ्यामोर पाणी असूनही विज कनेक्शन कापल्यामुळे पिकांना पाणी देऊ शकत नाही त्यामुळे कडक उन्हात पिके करपली जात असल्याचे पाहून शेतकर्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर होत आहेत. मागील अधिवेशनात शेतकर्यांचे विज कनेक्शन खंडीत केले जाणार नाही असे आश्वासन आपण दिले होते. मात्र आजही शेतकर्यांच्या कृषी पंपांची विज तोडणी केली जात आहे हे महाराष्ट्रातील शेतकर्यांचे
त्यामुळे शेतकर्यांची विज तोडणी थांबविण्याचे तातडीने आदेश द्यावेत अशी मागणी आ. कुणाल पाटील यांनी विधानसभेतील आपल्या भाषणात केले. स्व. विलासराव देशमुख अभय योजना सरकारने शेतकर्यांसाठी जाहिर केली त्याबद्दल मी महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन करतो. मात्र या योजतून विजबिल भरण्यासाठी शेतकर्यांना मुदतवाढ देवून संधी द्यावी व शेतकर्यांच्या कृषीपंपाचे विज कनेक्शन खंडीत करुन नये अशीही मागणी आ. कुणाल पाटील यांनी यावेळी केली.