गोळवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह वर्ष १० वे निमित्ताने श्रीमद् भागवत कथा, ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन
वैजापूर (प्रतिनिधी) श्री संत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज श्री संत नारायण गिरी महाराज यांच्या कृपाशीर्वाद ने गोळवाडी येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह वर्ष १० वे निमित्ताने श्रीमद् भागवत कथा, ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. ८ मार्च २०२२ रोजी सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल. तसेच दि ८ ते १४ मार्च २०२२ पर्यंत श्रीहरी महाराज वैष्णव यांच्या अमृतवाणीतून श्रीमद् भागवत कथा होईल. सोमवार दि. १४ मार्च २०२२ रोजी हरिभक्त पारायण वैशालीताई गायके बजाज नगर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे व ह भ प पांडुरंग महाराज पवार वारकरी शिक्षण संस्था गोळवाडी हे काकडा भजन हरिपाठ याचे नेतृत्व करतील व मठाधिपती महंत गुरुवर्य हरी भक्त पारायण श्री रामगिरी महाराज सरला बेट यांचे काल्याचे कीर्तन दि. १५ मार्च २०२२ होईल व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल म्हणून पंचक्रोशीतील सर्व गावकऱ्यांनी या सत्संगमय वातावरणात या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



