धुळे जिल्हा पेडीयाट्रीक असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. विलास वाडीले तर खजिनदारपदी डॉ. दादाभाई पाटील यांची निवड
धुळे (करण ठाकरे) इंडीयन ॲकॅडमी ऑफ पेडीयाट्रीक अंतर्गत धुळे जिल्हा पेडीयाट्रीक असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. विलास वाडीले यांची निवड झाली आहे. तर सचिवपदी डॉ. अविनाश सैंदाणे आणि खजिनदारपदी डॉ. दादाभाई पाटील यांची निवड करण्यात आलीआहे.
धुळे जिल्ह्यातील बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या जिल्हा पेडीयाट्रीक असोसिएशनची नुकतीच धुळ्यात बैठक संपन्न झाली. यावेळी ग्रामीण भागातील लहान मुलांच्या आरोग्यबाबत चर्चा करीत असतांना बालकामधील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी जगजागृती करण्याचे काम वैद्यकिय क्षेत्रातील बालरोगतज्ञांनी करावी यासंह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून धुळेजिल्हा पेडीयाट्रीक असोसिएशनच्या नुतन कार्यकारीणी घोषीत करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी बालरोगतज्ञ डॉ. विलास वाडीले यांची सर्वानुमते निवड झाली. तर सचिव म्हणून डॉ. अविनाश सैंदाणे यांची तर खजिनदारपदी बालरोगतज्ञ डॉ. दादाभाई पाटील यांची निवड करण्यात आली आहे. सहसचिव म्हणून डॉ. सुनिल पगारे, डॉ. मिलिंद सनेर, डॉ. कुणाल मेहता यांची नियुक्ती झाली आहे.
कार्यकारीणी संचालक म्हणून डॉ. जगदीश पाखरे, डॉ. संजय जोशी, डॉ. अभय कुलकर्णी, डॉ.सुरेश वसईकर, डॉ. रुपेश बच्छाव, डॉ. हेमंत नागरे, डॉ. निता हाटकर, डॉ. सुदिप सिसोदे यांची निवड करण्यात आली आहे. तर विशेष सल्लागार म्हणून डॉ. बी. जी. आगीवाल डॉ.बी. के. काबरे, डॉ. अरुणा जोशी यांची निवड झाली आहे. दरम्यान इंडीयन अॅकॅडमी ऑफ पेडीयाट्रीक अंतर्गत महाराष्ट्र पेडीयाट्रीक असोसिएशनच्या उत्तर महाराष्ट्र समन्वय म्हणून डॉ. निता हाटकर यांची निवड झाली आहे. नवनियुक्त सर्व पदाधिकार्यांचे वैद्यकिय क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.