महाराष्ट्र
एकनाथराव जाधव यांनी पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांशी केली चर्चा
वैजापूर (गहिनीनाथ वाघ) तालुक्याचा विकास कामाची भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य एकनाथराव जाधव यांनी वैजापूर पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांशी चर्चा केली व विकास कामाचा आढावा घेतला.
तसेच नवीन विकास कामे झपाट्याने करावे, असे दिले लेखी पत्र उपस्थित तालुका अध्यक्ष कल्याण पाटील, दागोंडे सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, जगताप उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष कैलास पवार, ज्येष्ठ नेते डॉक्टर राजीव डोंगरे, नगरपरिषद गटनेते दशरथ अण्णा बनकर, वैजापूर शहराध्यक्ष दिनेश सिंह राजपूत, तालुका उपाध्यक्ष नाना पाटील, गुंजाळ शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष कारभारी पाटील कराळे, तालुका कोषाध्यक्ष संतोष पाटील, मिसाळ शिवाजीराव पाटील, साळुंके, विजू चव्हाणसह भाजपचे अनेक कार्यकर्ते हजर होते.